हैदराबाद - पत्रकारांवरील हिंसाचाराचे प्रकरणे दिवसेंदिवस समोर येतात. बरेच पत्रकार ऑनलाईन हिंसाचाराला बळी पडतात. अशा परिस्थितीत युनेस्कोने महिला पत्रकारांवरील ऑनलाइन हिंसाचाराबाबत जागतिक सर्वेक्षण केले आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर महिला पत्रकारांना ऑनलाईन त्रासाला सामोरं जावं लागतं.
अहवालावर एक दृष्टीक्षेप...
- ऑनलाईन शोषण झाल्याचे जगातील 73 टक्के महिला पत्रकारांनी सांगितले आहे. शारीरिक हिंसाचार झाल्याचे 25 टक्के महिलांनी सांगितले. तर लैंगिक हिंसाचाराचे बळी ठरल्याचे 18 टक्के महिलांनी सांगितले. याचबरोबर जवळच्या लोकांवर अत्याचार करण्याच्या धमक्या मिळाल्याचे 13 टक्के महिला पत्रकारांनी सांगितले.
- ऑनलाईन हिंसाचाराच्या संदर्भात त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे 20 टक्के महिला पत्रकारांनी सांगितले. 13 टक्के महिला पत्रकारांनी आपल्या सुरक्षेत वाढ केली. तर 4 टक्के महिला पत्रकार हल्ल्यांच्या भीतीने नोकरीला जाऊ शकल्या नाहीत.
- ऑनलाईन शोषणामुळे मानसिक आरोग्यावर सर्वाधिक परिणाम झाल्याचे 26 टक्के महिला पत्रकारांनी मानले. तर ऑनलाईन हिंसाचाराचा बळी पडल्यानंतर त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या वैद्यकीय किंवा मानसशास्त्राची मदत घ्यावी लागल्याचे 12 टक्के महिला पत्रकारांनी सांगितले.
- राजकारण आणि निवडणुका यात 44 टक्के, मानवी हक्क आणि सामाजिक धोरण याप्रकरणी 31 टक्के याचबरोबर बहुतेक वेळेस लिंगामुळे 47 ट्क्के हल्ले होतात.
- दुष्प्रचार करणाऱ्या लोकांद्वारे लक्ष्य केले गेल्याचे 41 टक्के जणींनी सांगितले. तर 37 टक्के महिलांनुसार या हल्ल्यामागे राजकारणाशी संबंधित लोकांचा हात आहे. तसेच 57 टक्के महिलांनुसार गुन्हेगार अज्ञात असतात. फेसबुकवर ऑनलाईन हिंसाचाराच्या महिला अधिक बळी ठरतात.
- आतापर्यंत फक्त 25 ट्क्के महिला पत्रकारांनी ऑनलाईन हिंसाचाराच्या घटनांची सुचना दिली आहे. त्यातील 10 टक्के महिला पत्रकारांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तर 9 टक्के महिलांना घटना विसरण्याचा सल्ला देण्यात आला.
- ऑनलाईन हिंसा टाळण्यासाठी 30 टक्के महिलांनी सोशल मीडियाचा वापर करणे बंद केले. तर ऑनलाईन संवाद साधत नसल्याचे 20 टक्के महिलांनी सांगितले. याचबरोबर जास्त लोकांच्या संपर्कात येत नसल्याचे 18 टक्के महिलांनी सांगितले.
- लक्ष केंद्रित करणारे हे सर्वेक्षण म्हणजे युनेस्कोच्या कमिशनने 15 देशांमधील महिला पत्रकारांवरील ऑनलाईन हिंसाचाराच्या घटना, त्याचे परिणाम आणि प्रतिक्रियांचा एकत्रित अभ्यास केला आहे. महिला पत्रकारांचे संरक्षण आणि पत्रकारितेत महिलांचा सक्रिय सहभाग वाढवणे, हे त्याचे उद्दीष्ट आहे.