नवी दिल्ली- जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. वाचनालयात बसलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण करताना पोलीस या व्हिडिओत दिसत आहेत. यावरून आपचे नेते खासदार संजय सिंह यांनी पोलिसांवर टीका केली आहे.
'या घटनेतून दिल्ली पोलिसांचा क्रूरपणा समोर आला. असा कोणता कायदा आहे, तुम्ही(पोलीस) विद्यापीठाच्या ग्रंथालयात घुसून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करता. अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील कायदा सुव्यवस्था ढासळत चालली आहे, असे सिंह म्हणाले.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात १५ डिसेंबर रोजी पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. सीएए कायद्याविरोधात जामिया विद्यापीठात आंदोलन सुरू असताना ही घटना घडली होती. पोलिसांनी विद्यापीठातील ग्रंथालयात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. दिल्ली पोलिसांच्या या कृतीवर अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते.
हेही वाचा- प्रसिद्ध बंगाली अभिनेते, माजी खासदार तपस पॉल यांचे निधन