ETV Bharat / bharat

गगनभरारी..! डिसेंबर २०२१ पर्यंत भारत अवकाशात पाठवणार मानव - के. सिवन - चांद्रयान २ मोहीम

भारत २०२१ पर्यंत अवकाशामध्ये अंतराळवीर पाठवणार आहे. गगनयान मोहिमेअंतर्गत अवकाशात मानव पाठवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे - के. सिवन

के. सिवान
author img

By

Published : Sep 22, 2019, 10:07 AM IST

भुवनेश्वर - भारत २०२१ पर्यंत अवकाशामध्ये अंतराळवीर पाठवणार आहे. गगनयान मोहिमेअंतर्गत अवकाशात मानव पाठवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भारतासाठी ही मोहीम अती महत्त्वाची असून त्याद्वारे देशाची तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रातील प्रगती अधोरोखित होणार आहे. आयआयटी भुवनेश्वर येथे ८ व्या दिक्षांत समारंभावेळी इस्रो प्रमुख के. सिवन बोलत होते.

२०२० पर्यंत भारत मानवरहीत यान अवकाशात पाठवणार आहे. तर दुसरे मानवरहित यान २०२१ च्या जुनपर्यंत अवकाशात पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर डिसेंबर २०२१ पर्यंत भारत अवकाशात मानव पाठवणार आहे. इस्रोमधील प्रत्येकजण या मोहिमेवर काम करत आहे, असे सिवन म्हणाले. गगनयान मोहिमेवर चांद्रयान २ मोहिमेचा परिणाम होणार नाही, असेही सिवन म्हणाले.

इस्रोचे पहिले अध्यक्ष विक्रम साराभाई यांच्या दुरदृष्टीमुळे आज भारत अवकाश संशोधनात पुढे आहे. भारतीय अवकाश संशोधन नवनवीन कार्यक्रम हाती घेत आहे. ६० च्या दशकात अवकाश संशोधनात पाय रोवला. साराभाई यांनी त्यावेळी अवकाश संशोधनातली संधी हेरली.

वैयक्तिक जीवनामध्ये भीतीवर विजय मिळवा. काही प्रमाणात धोका पत्करा. तसेच यशस्वी होण्यासाठी अविष्कार आणि नव्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे, असे सिवन म्हणाले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.