ETV Bharat / bharat

'साध्वी प्रज्ञा सिंह यांचे वक्तव्य वीरमरण आलेल्यांसाठी अपमानकारक आणि लोकशाहीसही घातक'

दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारून माझे सुतक संपवले, असे वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केले होते. मुंबईच्या २६/११ हल्ल्यावरुन आताही राजकारण होते, हे वाईट आहे, असे निकम यांनी म्हटले आहे.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम
author img

By

Published : Apr 19, 2019, 6:37 PM IST

भंडारा - साध्वी प्रज्ञा सिंह यांचे करकरे यांच्याबाबतचे वक्तव्य म्हणजे वीरमरण आलेल्यांचा अपमान आहे, असे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी म्हटले आहे, अशा प्रकारे बोलणे लोकशाहीला घातक आहे. राजकारण्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यापूर्वी आपल्या जिभेला टाळे लावावे, असेही निकम म्हणाले. ते भंडारा येथे माध्यमांशी बोलत होते.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारून माझे सुतक संपवले, असे वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केले होते. २६/११ चा मुंबई हल्ला हा देशाविरुद्ध होता, ही बाब सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. या हल्ल्यातील मुख्य आरोपी पाकिस्तानी अजमल कसाबनेही न्यायालयासमोर कबुली दिली होती, की तो आणि त्याच्या साथीदार इस्माईलने केलेल्या गोळीबारात करकरे, साळसकर, कामटे हे मृत्युमुखी पडले होते. मात्र, तरीही आज काही राजकारणी व्यक्ती यावरुन राजकारण करत आहेत, असा आरोपही निकम यांनी यावेळी केला.

मुंबईच्या २६/११ हल्ल्यावरून आताही राजकारण होत आहे, हे वाईट आहे. आपल्या संस्कृतीत मरणाऱ्या व्यक्तीसंदर्भात वाईट बोलले जात नाही आणि तरीही काही राजकारणी यावर अशा पद्धतीने भाष्य करीत आहेत, हे खूप चुकीचे आणि लोकशाहीसाठी घातक असल्याचेही निकम म्हणाले.

Intro:मराठी आणि हिंदी दोन्ही बाईट पाठवीत आहे
Anc : साध्वी प्रज्ञा सिंग यांनी शाहिद हेमंत करकरेला मी श्राप दिला होता त्यामुळे त्याचा मृत्य झाला असे व्यक्तव्य केले होते तिच्या या वक्तव्यावर बोलतांना विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी हा शाहिदांचा अपमान असून अश्या पद्धतीचे भाष्य हे लोकशाही ला घातक आहे, राजकारण्यांनी अश्या पद्धतीचे वक्तव्य करण्याअगोदर आपल्या जिभेला टाळा लावावा असे मत त्यांनी माध्यमांसमोर मांडले.Body:26-11 चा मुंबई वरचा हल्ला हा देशाविरुद्धचा युद्ध होता ही बाब सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. या हल्ल्यातील मुख्य आरोपी पाकिस्थानी अजमल अमीर कसाब यांनी देखील न्यायालयासमोर कबुली दिली होती की त्यांनी आणि त्याच्या साथीदार इस्माईल ने केलेल्या गोळीबारात करकरे, साळसकर, कामटे हे धारार्थी पावले, असे असतांना देखील आज काही राजकारणी राजकारण करीत आहेत आणि माझ्या मुळे हे पोलीस अधिकारी मरण पावले अशी दरपोक्ती मारत आहेत हे लोकशाही साठी अत्यंत धोका दायक आहे, हे शाहिदांचे अपमान करणारे वक्तव्य आहे अश्या पद्धतीचे वक्तव्य करणाऱ्या राजकारण्यांनी बोलतांना सांभाळायला हवं आणि असे बोलण्या अगोदर आपल्या जिभेला टाळा लावला पाहिजे जेणे करून कोणाच्या मनात कोनाविषयी मानव्हेलना होणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे.
हे खूप दुःखदायक आहे 26 -11 वर आताही राजकारण होत आहे. आपल्या संस्कृती मध्ये मरणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत वाईट बोलले जात नाही आणि तरी काही राजकारणी या वर अश्या पद्धतीने भाष्य करीत असेल हे खूप चुकीचे आणि लोकशाही साठी घातक असल्याचे त्यांनी संगीलते.
बाईट : उज्वल निकमConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.