नवी दिल्ली : ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेर या पदांसाठी यूजीसीकडून घेण्यात येणारी नेट परीक्षा ही मे महिन्यात होणार आहे. 2 मे 2021 पासून ही परीक्षा होणार असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहीर केले आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत 2, 3, 4, 5, 6, 7, 10, 11, 12, 14 आणि 17 मे दरम्यान यूजीसी-नेट ही परीक्षा घेण्यात येणार आहे. अशा आशयाचे ट्विट करत पोखरियाल यांनी याबाबत माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही परीक्षा केवळ कम्प्युटर बेस्ड टेस्ट या पद्धतीने होणार आहे. याबाबतची अधिक माहिती वाचण्यासाठी यूजीसीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या, असे एनटीएने आपल्या माहितीपत्रात म्हटले आहे.
यासाठी २ फेब्रुवारीपासून ऑनलाईन नावनोंदणी करता येणार आहे. २ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत ही प्रक्रिया सुरू असणार आहे. परीक्षेची फी भरण्यासाठी तीन मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
हेही वाचा : दिलासा! कृषी अधिभाराचा फटका नाही, पेट्रोल-डिझेलचे दर मंगळवारी जैसे थे