ETV Bharat / bharat

पुलवामा आयईडी ब्लास्ट : ९ जखमींपैकी २ जवानांना वीरमरण - jammu kashmir

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून आयईडी हल्ला करण्यात येईल, असा अलर्ट एका दिवसापूर्वीच आला होता. परंतु, तरीही हल्ला करण्यात दहशतवाद्यांना यश आले.

पुलवामा आयईडी हल्ला
author img

By

Published : Jun 18, 2019, 11:58 AM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सोमवारपासून दहशतवाद्यांनी भारतीय सेनेच्या वाहनांना लक्ष करत आयईडी स्फोट घडवून आणला होता. यामध्ये ९ जवान जखमी झाले होते. आज यापैकी २ जवानांना उपचारादरम्यान वीरमरण आले आहे.

ani tweet
एएनआय ट्विट

संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता राजेश कालिया यांनी माहिती देताना सांगितले, की पुलवामा येथील अरिहल-लस्सीपुरा रोडवरुन जाताना दहशतवाद्यांनी जवानांच्या ४४ राष्ट्रीय रायफल्सच्या ताफ्यातील वाहनाला आयईडी भरलेल्या वाहनाने धडक देत स्फोट घडवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यामध्ये जखमी झालेल्या जवानांवर श्रीनगर येथील सैन्याच्या रुग्णालयात भर्ती करण्यात आले. घटनास्थळी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याठिकाणी नाकेबंदी करण्यात आली असून शोध अभियान चालू आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून आयईडी हल्ला करण्यात येईल, असा अलर्ट एका दिवसापूर्वीच आला होता. त्यानंतर सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. मात्र, हा स्फोट झाल्यानंतर लष्कराने जोरदार शोधमोहीम हाती घेतली आहे.

Intro:Body:

Nat 06

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.