नवी दिल्ली - विदेशात ड्रग्स पुरवठा करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विषेश पथकाने ही कामगिरी केली आहे. पुनीत अरोडा (वय 42, गुरुग्राम हरियाणा), विनोद कुमार (वय 44, उत्तम नगर दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील एकाचे वडील युकेमध्ये औषंधाच्या दुकानात अवैधरीत्या ड्रग्स विकत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
हेही वाचा.. #दिल्ली हिंसाचार : गोकुळपूरी अन् भगीरथीविहार कालव्यामध्ये आढळले 3 मृतदेह
दिल्ली येथून विदेशात मोठ्या प्रमाणात ड्रग्सची सप्लाई होत आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांचे एक पथक या सप्लाईवर नजर ठेऊन होते. दरम्यान, 26 फेब्रुवारी रोजी पोलिसांना पुनीत अरोडा ड्रग्स घेऊन मटियाला येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. तिथे विनोद नावाच्या व्यक्तीकडून पॅकिंग केली जाणार होती. दरम्यान, पोलिसांनी सापळा रचून त्याठिकाणी कारवाई केली. यात आरोपींकडून 232 किलो ड्रग्स जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 50 करोडच्या घरात असल्याची माहिती मिळत आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक संजय दत्त यांच्या नेतृत्वाखाली पोलीस चंद्र बिष्ट, पवन कुमार यांच्या पथकाने कारवाई ही कारवाई केली आहे.
यातील आरोपी विनोद कुमार एका कुरियन कंपनीत एजंट होता. त्याला कस्टम चेकिंग बद्दल माहिती होती. त्याचा उपयोग तो ड्रग्स सप्लाईसाठी करत होता. 4 ते 5 वर्षांपासून हे आरोपी ड्रग्स सप्लाई करत होते.
्