जयपूर - राजस्थानातील चुरु जिल्ह्यात दोन अल्पवयीन बहिणींवर शारीरिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना जिल्ह्यातील रतनगड तालुक्यातील दाऊदसर गावात घडली. या प्रकरणी पोलिसांनी गावातील एका युवकासह तिघांना अटक केली आहे.
अत्याचारीत दोघी मुली सख्ख्या बहिणी आहेत. तीन जणांनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी चुरु महिला पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींवर पोस्को आणि भारतीय दंडविधान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही मुलींना 'राजकीय भरतीया रुग्णालयात' दाखल करण्यात आले असून वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
पोलिसांना दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, आरोपी पवन याने दोन सहकाऱ्यांसह शुक्रवारी (5 जून) रात्री झोपडपट्टीत राहत असलेल्या मुलींवर बलात्कार केला. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर कुटुंबियांना याची माहिती झाली. त्यांनी तिघांना पोलिसांच्या ताब्यात दिले असून या प्रकरणी पोलीस अधिकारी सुखविंदर पाल सिंह तपास करत आहेत.