ETV Bharat / bharat

पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात, 14 ठार तर अनेक जण जखमी

author img

By

Published : Aug 15, 2019, 7:09 PM IST

पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी वेगवेगळ्या दोन रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी दोन रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत.

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी वेगवेगळ्या दोन रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. परगणा जिल्ह्यात 7 जणांचा तलावात गाडी बुडाल्याने तर मालदा येथे 7 जणांचा रस्त्यावर अपघातमध्ये मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

परागणा येथे एक कुटुंब कोलकाता विमानतळावरून परतत होते. त्यावेळी तलावामध्ये गाडी पडल्यामुळे एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील मालदा जिल्ह्यामध्ये बुधवारी रात्री उशिरा वेगात आलेल्या लॉरीने रस्त्यावर उभ्या असलेल्या एसयूव्हीला गाडीला धडक दिली. त्यामध्ये 6 जण ठार झाले असून काही जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, एसयूव्ही कारमधील लोक लग्नाला जात होते. हा अपघात बाखरपूर येथील राष्ट्रीय महामार्ग-34 वर घडला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आलोक राजोरिया यांनी दिली.

अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या लोकांना कोलकाता येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून जखमींवर मालदा मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर लॉरी चालक फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना गझोल येथून अटक केली आहे.

Intro:Body:

national

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.