ETV Bharat / bharat

जेएनयूतील दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील पेरियार वसतिगृहातील दोन विद्यार्थ्यी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर विद्यापीठाच्या प्रशासनाने वसतिगृह सील केले आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांना वसतिगृहांमध्ये राहण्यासाठी कडक सूचना देण्यात आल्या.

जेएनयू
जेएनयू
author img

By

Published : Jul 8, 2020, 10:36 AM IST

नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूचा संसर्ग सतत वाढत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील पेरियार वसतिगृहातील दोन विद्यार्थ्यी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर विद्यापीठाच्या प्रशासनाने वसतिगृह सील केले आहे. याशिवाय हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना 14 दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक सुविधा पुरविल्या जातील. त्यामुळे त्यांना बाहेर पडावे लागणार नाही. कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांना वसतिगृहांमध्ये राहण्यासाठी कडक सूचना देण्यात आल्या. वसतिगृहांमध्ये राहणारे बहुतेक विद्यार्थी त्यांच्या घरी गेले आहेत. त्याचबरोबर काही विद्यार्थी वसतिगृहात राहत आहेत. संपूर्ण वसतिगृह स्वच्छ करण्यात आले आहे.

दरम्यान भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा सात लाख पार झाला आहे. कोरोनामुळे देशभरात मागील 24 तासांत 467 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकुण संख्या 20 हजार 160 इतकी झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक कोविड-19 वॉर रूम स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. जी 24 तास कोरोना विरोधातील सर्व हालचालीवर लक्ष ठेऊन असणार आहे. या कोविड-19 वॉर रूममध्ये 25 जण काम करणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.