श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या सीमा भागामध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहेत. दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील बोनबाजार भागामध्ये सुरक्षादलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दरम्यान, दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.

दक्षिण काश्मीरमधील बोनबाजार परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. आज सकाळी सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर या चकमकीला सुरुवात झाली. सुरक्षा रक्षकांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना ठार केले असून आणखी एक दहशतवादी लपून बसल्याची माहिती आहे.