मदुरै (तामिळनाडू) - मदुरै येथील दुकानाला लागलेल्या आगीत नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात तामिळनाडू अग्निशमन व बचाव सेवा विभागातील दोन कर्मचारी ठार झाले.
शुक्रवारी रात्री ही घटना घडली.
मदुरै येथील दुकान असलेल्या इमारतीला आग लागली होती. यानंतर ही इमारत पडली. या वेळी, बचावकार्य करत असलेल्या अग्निशमन दलाच्या दोन कर्मचाऱ्यांचा ढिगाऱ्याखाली सापडल्याने मृत्यू झाला. तर, इतर दोघे जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
हेही वाचा - मध्य प्रदेशात पिकअप वाहनाचा भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दुकानाला आग लागली आणि माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन सेवेची टीम ही आग विझवित असताना ही जुनी इमारत कोसळली. याच्या तडाख्यात अग्निशमन दलाचे 4 कर्मचारी सापडले. चौघांनाही ढिगाऱ्याबाहेर काढण्यात आले. त्यापैकी कृष्णमूर्ती आणि शिवराजन हे दोघे मरण पावले.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी पलानीसामी यांनी काल रात्री मदुरै येथे अग्निशामक कारवाईत मृत्यू झालेल्या अग्निशमन अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली.
'या अपघातात मृत्यू झालेल्या अग्निशमन अधिकारी शिवराजन आणि कृष्णमूर्ती यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपये दिले जातील,' असे मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच मृत अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी दिली जाईल, असेही जाहीर करण्यात आले आहे. दोन जखमी अग्निशमन अधिकाऱ्यांना तीन लाख रुपयांची आर्थिक मदतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.
हेही वाचा - गुजरातच्या वलसाडमध्ये प्लास्टिक कंपनीत भीषण आग