नवी दिल्ली - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल आणि दिल्ली पोलीसचे काही अधिकारी यांनी बुधवारी हिंसाग्रस्त भागात दौरे केले होते. तसेच परिस्थिती नियंत्रणात असल्याचा आणि शांतता असल्याचा दावा केला होता. हिंसाग्रस्त भागात सर्वत्र सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. असे असतानाही, गुरुवारी रात्री काही हल्लेखोरांनी दोन भावांची हत्या केली आहे. आमिर (28) आणि हासिम (18) अशी मृत युवकांची नावे आहेत.
हेही वाचा... दिल्लीतील जनजीवन पूर्व पदावर, परिस्थिती नियंत्रणात
कुटुंबीयांची प्रतिक्रिया...
मृत युवकांचा भाऊ सेरउद्दीन याने त्या घटनेबाबत बोलताना सांगितले, त्याचे दोन्ही भाऊ मुस्तफाबादमध्ये होते. बुधवारी रात्री आमिर आणि हासिम हे दोघे आपल्या मोटालसायकलवर भोपुरा येथे काही कामानिमित्त गेले होते. रात्री उशीरापर्यंत ते घरी परतले नाही. त्यांना मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यासोबत कोणताही संपर्क होऊ शकला नाही. रात्रभर त्यांचा शोध घेतला मात्र ते न सापडल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली. अखेर करावल नगर भागातील एका कालव्यात त्या दोघांचे मृतदेह पोलिसांनी आढळून आले.
डोक्यावर हल्ला करून केली हत्या
दोन्ही भावांच्या डोक्यांवर खोलवर जखमा असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. त्यामुळे गोळी अथवा धारदार शस्त्राने हल्ला झाला असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
अमीर यांच्यावर कुटुंबांचा होता भार
हत्या करण्यात आलेल्या दोन भावांमध्ये अमीर याच्यावर संपुर्ण कुटुंबीयांचा भार होता. तसेच त्यांना दोन लहान मुलीही आहेत. अमीर यांच्या हत्येने त्यांच्या मुलींचा आधार गेला आहे.