ETV Bharat / bharat

अलीगडमध्ये पैशासाठी चिमुरडीची निर्घृण हत्या; डोळे काढून टाकले होते अॅसीड - राष्ट्रीय सुरक्षा कायदा

अलीगडमध्ये अडीच वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. लहान मुलीचे डोळे काढून अॅसीड टाकण्यात आले. यानंतर, मुलीली कचऱ्याच्या ढिगात फेकून देण्यात आले होते.

मुलीची आई
author img

By

Published : Jun 7, 2019, 6:17 PM IST

नवी दिल्ली - उत्तरप्रदेश येथील अलीगडमध्ये अडीच वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. लहान मुलीचे डोळे काढून अॅसीड टाकण्यात आले. यानंतर, मुलीली कचऱ्याच्या ढिगात फेकून दिल्याची ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली होती. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

अशी घडली घटना

आरोपींकडून मुलीच्या घरच्यांनी पैसे घेतले होते. वेळेवर पैसे न दिल्याने त्यांच्यांत तणाव वाढला होता. आरोपींनी लहान मुलीला बिस्किटाचे अमिष दाखवून घरी बोलावले. आरोपींना तिला गळा दाबून मारले आणि तिचे डोळे काढून अॅसीड टाकले.

याप्रकरणी मुलीवर बलात्कार झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. परंतु, शवविच्छेदन अहवालात मुलीवर बलात्कार झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी जाहिद आणि अस्लम या दोघांनी पोलिसांनी अटक केली आहे.

हलगर्जीपणा केल्यामुळे ५ पोलीस निलंबित-

मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पालकांनी पोलिसात तक्रार दिली होती. पालकांनी संशयित आरोपींबद्दल माहितीही दिली होती. परंतु, पोलिसांनी मुलीचा शोध घेतला नाही. याप्रकरणी राज्य सरकारने कारवाई करताना ५ पोलिसांना निलंबित केले आहे. याप्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

लहान मुलीच्या या हत्येमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बॉलीवूड, विविध क्षेत्रातील तज्ञ आणि राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करताना लिहिले, की या दर्दनाक हत्येमुळे मी चिंतीत झालो आहे. एका लहान मुलीसोबत अशी हैवानियत कोण करू शकते. या भयानक अपराधाला लवकरात लवकर कडक शिक्षा देवून मुलीला न्याय दिला पाहिजे.

rahul gandhi
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी

काँग्रेस महासचिव प्रियंका गांधीनी ट्वीट करत लिहिले, अलीगड येथे लहान मुलीसोबत झालेल्या घटनेनंतर पुर्णपणे हादरले आहे. मुलीच्या आई-वडिलांची काय अवस्था असेल याचा विचारही करू शकत नाही. आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे.

twinkle and raveena
ट्विंकल खन्ना आणि रवीना टंडन

विरेंद्र सेहवाग, अनुपम खेर, ट्विंकल खन्ना, रवीना टंडन आणि मिताली राज यांनी मुलीला न्याय मिळण्यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

anupam kher
अनुपम खेर
mithali raj
मिताली राज
virender sehwag
विरेंद्र सेहवाग

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.