हैदराबाद - येथील बंजारा हिल्स रस्त्यावर आज (मंगळवारी) एका मुलीचा बस खाली येऊन मृत्यू झाला. मुंबईत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये अभियंता म्हणून ही मुलगी नोकरीसाठी होती. सोहिनी सक्सेना असे मृत मुलीचे नाव आहे.
हेही वाचा- अजित पवारांनी सिल्व्हर ओकमध्ये शरद पवारांची घेतली भेट ; चर्चा गुलदस्त्यात
सोहिनी सक्सेना (वय24) दुचाकीवरून जात होती. तेव्हा तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या (टीएसआरटीसी) बसने तिला जोराची धडक दिली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर चालकाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संतप्त नागरिकांनी बस थांबविली. त्यांनी बसवर दगडफेक केली आणि चालकाला मारहाण केली. मात्र, पोलिसांनी चालकाचा बचाव करून ताब्यात घेतले.