नवी दिल्ली : शाश्वत वाहतुकीला चालना देण्यासाठी रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाने पर्यायी इंधनांसाठी नियमावली जारी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली.
-
After testing use of H-CNG as compared to neat CNG for emission reduction, the Bureau of Indian Standards has developed specifications of hydrogen enriched Compressed Natural Gas (H-CNG) for automotive purposes as a fuel.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">After testing use of H-CNG as compared to neat CNG for emission reduction, the Bureau of Indian Standards has developed specifications of hydrogen enriched Compressed Natural Gas (H-CNG) for automotive purposes as a fuel.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 27, 2020After testing use of H-CNG as compared to neat CNG for emission reduction, the Bureau of Indian Standards has developed specifications of hydrogen enriched Compressed Natural Gas (H-CNG) for automotive purposes as a fuel.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 27, 2020
"नीट सीएनजी गॅसच्या तुलनेत एच-सीएनजी गॅसची इंधन म्हणून चाचणी केल्यानंतर, भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) इंधन म्हणून हायड्रोजन इनरिच्ड कॉम्प्रेस्ड नॅचुरल गॅसचा (एच-सीएनजी) इंधन म्हणून वापर करण्यास परवानगी दिली आहे. नीट सीएनजीच्या तुलनेत हा गॅस कमी प्रमाणात उत्सर्जन करतो असे चाचणीमध्ये समोर आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्री गडकरींनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली.
केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ मध्ये सुधारणा करुन, एच-सीएनजी गॅसचाही इंधनामध्ये समावेश करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले असल्याचेही गडकरींनी स्पष्ट केले. वाहतुकीसाठी पर्यायी शुद्ध इंधन वापर करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचेही गडकरी यावेळी म्हणाले.
हेही वाचा : कचरा व्यवस्थापनाची प्रभावी धोरणे...