पाटणा : येथील मोनिका दास यांची येत्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या त्या देशातील पहिल्याच तृतीयपंथी आहेत.
दास या कॅनरा बँकेतील अधिकारी आहेत. पीठासीन अधिकारी म्हणून त्या मतदानाचे आणि देखरेखीचे काम पाहतील. त्यांना ८ ऑक्टोबरला या कामाचे प्रशिक्षण देण्यात येईल. यापूर्वी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांसाठी रिया सरकार या तृतीयपंथी शिक्षिकेची मतदान अधिकारी म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र, पीठासीन अधिकारी म्हणून निवड झालेल्या मोनिका या पहिल्याच तृतीयपंथी आहेत.
२८ ऑक्टोबरपासून मतदान..
बिहार विधानसभा निवडणुकांसाठी २८ ऑक्टोबरपासून मतदानास सुरुवात होईल. तीन टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार असून, ३ आणि ७ नोव्हेंबरला पुढील टप्प्यांमधील मतदान होणार आहे. तसेच, १० नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील.
हेही वाचा : रामविलास पासवान यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर