नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी केरळ राज्यातील कोझिकोडे येथे झालेल्या विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहून दुःख व्यक्त केले. या दुर्घटने विषयी मोदींनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा केली.
मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, की ज्यांनी या दुर्घटनेत आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. यातील जखमी लवकरात लवकर तंदुरुस्त व्हावेत. त्या सर्वाना सर्व प्रकारची मदत लवकर मिळण्याची व्यवस्था करण्यात येईल.
राष्ट्रपती कोविंद यांनी म्हटले, की या घटनेची वार्ता ऐकून दुःख वाटले. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याशी याविषयी चर्चा झाली आहे. तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
या घटनेविषयी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनीही दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. यातील जखमी लवकरात लवकर तंदुरुस्त व्हावेत.