- मुंबई - कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टर-नर्स (परिचारिका) आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांचा विमा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार मृत कोरोना योध्याच्या कुटुंबाने विम्यासाठी अर्ज केल्यानंतर त्याच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होणे अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात मात्र राज्यातील एकाही सरकारी रुग्णालयातील मृत परिचारिकांच्या कुटुंबाला ही रक्कम मिळालेली नाही. याविरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आवाज उठवला होता. 'ईटीव्ही भारत'ने यासंबंधीचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध करत या विषयाला वाचा फोडली होती. त्यानुसार अखेर या वृत्ताची दखल घेत राज्य सरकारने कोरोना योध्ये, अर्थात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर विम्याची रक्कम अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यासाठीचे प्रस्ताव एका आठवड्यात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे परिचारिका खूश आहेत.
सविस्तर वाचा - मृत कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 50 लाखांची मदत; सरकारला आली जाग
- मुंबई - महापालिकेची निवडणूक राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकासआघाडी एकत्र लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच मंत्र्यांची एक तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मलिक यांनी ही माहिती दिली.
सविस्तर वाचा - मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार - नवाब मलिक
- मुंबई - आज राज्यात ५,५३५ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १७,६३,०५५ वर पोहोचला आहे. राज्यात आज १५४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४६,३५६ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.
सविस्तर वाचा - राज्यात ५,५३५ नवीन रुग्णांचे निदान, १५४ रुग्णांचा मृत्यू
- मुंबई - कराची बेकरी आणि कराची स्विट्स 60 वर्षांपासून मुंबईसह देशात आहे. त्यांचा पाकिस्तानशी सबंध नाही. निर्वासित सिंधी, पंजाबी बांधवांनी कष्टातून ऊभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला, ही मागणी निरर्थक आहे, ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी ट्विट करून दिली आहे. त्यामुळे, कराची बेकरीचे नाव बदलण्याच्या विषयावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे.
सविस्तर वाचा - शिवसेना नेत्याने कराची बेकरीचे नाव बदलले, संजय राऊत म्हणाले हे निरर्थक
- जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना गुरुवारी सायंकाळी तातडीने उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात येणार आहे. त्यांची प्रकृती चांगली असून, कोणत्याही प्रकारचा धोका नको म्हणून त्यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे.
सविस्तर वाचा - एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण; आधी कन्येलाही झाला होता संसर्ग
- मुंबई - महाआघाडी सरकारमध्ये शरद पवारांच्या शब्दाला किंमत राहिलेली नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. कारण वाढीव वीज बिलांसंदर्भात त्यांना निवेदन देऊनही आघाडी सरकारच्या वर्तणुकीत काहीही फरक पडलेला नाही. ग्राहकांवरचा वाढीव वीज बिलांचा बोजा कमी झालेला नाही, अशी सडेतोड टीका मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
सविस्तर वाचा - महाविकास आघाडीत पवार साहेबांच्या शब्दाला किंमत नाही? - बाळा नांदगावकर
- मुंबई - राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोरोनामुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. आता ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी मुंबईत केली.
सविस्तर वाचा - ग्रामपंचायत निवडणुकांचा यापूर्वीचा कार्यक्रम रद्द, नव्याने जाहीर होणार तारखा
- इस्लामाबाद - दहशतवादाला आर्थिक साहाय्य केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफिज सईदला 10 वर्ष 6 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. सईदसह जफर इक्बाल आणि अब्दुल रहमान मक्की यांनाही साडेदहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
सविस्तर वाचा - लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफिज सईदला 10 वर्षांची शिक्षा
- डेहराडून - बद्रीनाथ धामचे दरवाजे आज 3 वाजून 35 मिनिटांनी बंद करण्यात आले. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळी हंगामामुळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येतात. दरवाजे बंद झाल्यानंतर प्रशासकीय परवानगीशिवाय हनुमान चट्टीच्या पुढे जाण्याची परवानगी नसते.
सविस्तर वाचा - प्रसिद्ध बद्रीनाथ धामाचे दरवाजे आजपासून बंद
- मुंबई - जागतिक पुरुष दिन 19 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. म्हणजे आज जगभरात जागतिक पुरुष दिन साजरा करण्यात येत आहे. तसेच, आज वर्ल्ड टॉयलेट डे (जागतिक शौचालय दिन) साजरा केला जातो. या निमित्ताने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भन्नाट ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी संजय राऊतांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.
सविस्तर वाचा - 'नॉटी पुरूषांच्या विचारांची घाण घालवून महाराष्ट्र स्वच्छ करण्यास मदत करा';अमृता फडणवीसांची राऊतांवर टीका