ETV Bharat / bharat

Top 10 @11 PM. रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या... - राज्यासह देशातील महत्वाच्या बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top ten news
Top 10 @11 PM. रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या...
author img

By

Published : Oct 23, 2020, 4:15 PM IST

Updated : Oct 23, 2020, 11:01 PM IST

  • मुंबई - राज्यात आज १३,२४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे कोरोनावर मात करून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा १४,४५,१०३ वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.५२ टक्क्यांवर पोहोचले आहे. दिवसभरात राज्यात आज ७,३४७ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन १,४३,९२२ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात ७,३४७ नवे कोरोना पॉझिटिव्ह; १३,२४७ रुग्णांना डिस्चार्ज, १८४ रुग्णांचा मृत्यू

  • परभणी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिहारवर जास्त प्रेम आहे, असे देवेंद्र फडणवीस बिहारमधल्या एका प्रचार सभेत म्हणाले, त्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या बाबतीत बोलण्याचा अधिकारच राहिला नाही, असे अल्पसंख्याक मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राबद्दल बोलण्याचा अधिकारच राहिला नाही - नवाब मलिक

  • चंदिगढ - भाजप पंजाबात जातीय दुफळी निर्माण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी केला. मात्र, त्यांना या प्रयत्नात यशस्वी होऊ देणार नाही. जातीय राजकारणाचा फायदा उचलण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे, मात्र, त्यांचा हा अजेंडा यशस्वी होऊ देणार नाही, असे सिंह म्हणाले. भाजपने पंजाबात 'दलित इन्साफ यात्रा' आयोजित केली आहे, त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.
  • मदुराई - तामिळनाडूीतल मदुराई जिल्ह्यात आज(शुक्रवार) फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात तीन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कूलुपट्टीजवळील चेंगुलाम भागात हा स्फोट झाला. फटाके बनविण्यासाठी तयार केलेल्या रसायनाच्या मिश्रणाने पेट घेतल्यानंतर स्फोट झाला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

तामिळनाडूत फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, ५ जणांचा मृत्यू

  • मुंबई - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर बोलताना त्यांनी भाजपपेक्षा दुप्पट वेगाने राष्ट्रवादी पक्षाचा विस्तार करेन असे सांगितले. माझ्या डोक्यावरील ओझे कमी झाल्यासारखे आज वाटत आहे. भाजपमध्ये अन्याय होत असल्याने आपण राष्ट्रवादीत प्रवेश करावा असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता, असे खडसे म्हणाले.

भाजपपेक्षा दुप्पट वेगाने राष्ट्रवादीचा विस्तार करेन, प्रवेशानंतर खडसेंचा शब्द

  • मुंबई - राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी 10 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. दिवाळीपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत पोहोचविण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या दहा हजार कोटी रुपयांमध्ये शेती, घरांसाठी, रस्ते-पुलाचं बांधकाम, पाणी पुरवठा याचा समावेश आहे.

राज्य सरकारची मोठी घोषणा.. अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची मदत

  • मुंबई - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे मंत्रिपद काढून भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादीत राजकीय पुनर्वसन होणार असल्याचे सूत्राने सांगितले. आव्हाड यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक घेतली आहे.

एकनाथ खडसेंना गृहनिर्माणमंत्रीपद मिळण्याची शक्यता; शरद पवारांकडून जितेंद्र आव्हाडांची मनधरणी

मदुराई - तामिळनाडूीतल मदुराई जिल्ह्यात आज(शुक्रवार) फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात तीन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कूलुपट्टीजवळील चेंगुलाम भागात हा स्फोट झाला. फटाके बनविण्यासाठी तयार केलेल्या रसायनाच्या मिश्रणाने पेट घेतल्यानंतर स्फोट झाला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

  • जळगाव - बिहार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्याची काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी दुपारी होळी करण्यात आली. भाजपाकडून या जाहीरनाम्यात सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणारी आश्वासने देण्यात आलेली आहेत. कोरोनासारख्या महामारीचा आधार घेऊन जनतेला फसवण्याचे काम भाजपा करत असल्याची टीका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली.

जळगावात काँग्रेसने केली भाजपाच्या जाहीरनाम्याची होळी

  • नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. एका वृत्तानुसार, त्यांच्यावर नवी दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयामध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

विश्वविजेता कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

  • मुंबई - अभिनेता हर्षवर्धन राणे याने आपल्या अनोख्या डबिंगची आठवण सांगितली. तैशच्या टिझर रिलीजपूर्वी हर्षवर्धन रुग्णालयात कोविड-१९वर उपचार घेत होता. त्यामुळे त्याने रुग्णालयातील आयसीयूमधून डबिंग केले होते.

कोविड-१९चा उपचार घेणाऱ्या हर्षवर्धन राणेने केले होते 'आयसीयू'मधून डबिंग

Last Updated : Oct 23, 2020, 11:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.