- मुंबई - परतीच्या पावसाने राज्यातील चार ते पाच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती आणि शेती पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्यासाठीची तातडीने मदत मिळायला हवी. परंतु, या मदतीवरूनच राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने उभे राहिले आहेत. राज्याला येणारा जीएसटीचा परतावाही मिळत नसल्याचे सांगत महाविकास आघाडीकडून कोणतीही भरीव मदत जाहीर न झाल्याने नुकसानग्रस्त शेतकरी मात्र वाऱ्यावरच असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण; सत्ताधारी, विरोधक आमने-सामने
- मुंबई - दिवसभरात राज्यात ८ हजार १५१ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन १ लाख ७४ हजार २६५ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज २१३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरात राज्यात ८ हजार १५१ नवीन कोरोना रुग्ण; २१३ रुग्णांचा मृत्यू
- चंदीगड - केंद्र सरकारने मागील महिन्यात तीन कृषी कायदे आणले आहेत. या कायद्यांना पंजाब आणि हरयाणा राज्यातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. राज्यभर आंदोलने आणि निदर्शने सुरू असतानाच पंजाब सरकारने शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी चार नवी विधेयके आणली आहेत. त्यानुसार तांदुळ आणि गहू जर किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी/विक्री केला तर कमीत कमी ३ वर्षे तुरुंगवास आणि दंडाची तरतूद विधेयकात केली आहे.
..तर ३ वर्ष तुरुंगवास, केंद्रीय कायद्याविरोधात पंजाब सरकारची चार विधेयके
- नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी आज(मंगळवार) देशवासीयांच्या नावे संदेश जारी केला. यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन केले. दसरा दिवाळी सण असल्याने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोदी मोठी घोषणा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, मोदींनी कोणतीही मोठी घोषणा केली नाही, किंवा भारत चीन वादावर वक्तव्य केले नाही. लॉकडाऊन गेले असले तरी कोरोना गेला नाही, असे म्हणत 'जब तक दवाई नही तब तक कोई ढिलाई नही', असे मोदी म्हणाले.
लस येत नाही तोपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई सुरुच राहणार - पंतप्रधान मोदी
- मुंबई- पावसामुळे राज्यातील नवीन कांद्याचे नुकसान झाले असून, जुन्या कांद्याचा साठा कमी प्रमाणात आहे. त्यातच परराज्यांतून मागणी वाढल्याने कांद्याचे भाव कडाडले आहेत. घाऊक बाजारात नवीन कांद्याला प्रति किलो 30 ते 55 रुपये, तर जुन्या कांद्याला 50 ते 80 रुपये भाव मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात दर्जानुसार 80 ते 100 रुपये किलो या भावाने कांद्याची विक्री होत आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याचे भाव तेजीत राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कांद्याने ग्राहकांसह शेतकऱ्यांच्याही डोळ्यांत पाणी, 9 हजार क्विंटल उच्चांकी भाव
कोल्हापूर- आज नवरात्रौत्सवाचा चौथा दिवस. करवीर निवासिनी अंबाबाई देवीची 'ओमकाररुपीणी' स्वरुपात पूजा बांधण्यात आली. दरवर्षी संपूर्ण देशभरातील भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी आणि नवरात्रौत्सव काळातील विविध रुपांमधील पूजा पाहण्यासाठी येत असतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरांमध्ये भक्तांना प्रवेश नाही. त्यामुळे, भाविकांना ऑनलाइन माध्यमातूनच देवीचे हे देखणे रूप आपल्या डोळ्यात साठवावे लागत आहे.
नवरात्रौत्सवाच्या चौथ्या दिवशी अंबाबाईची 'ओमकाररुपिणी' स्वरुपात पूजा
- भोपाळ - मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजप उमेदवार इमरती देवी यांच्याबद्दल केलेल्या असभ्य वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली आहे. कमलनाथ आमच्या पक्षाचे आहेत. मात्र, त्यांनी ज्या प्रकराची भाषा वापरली ती मला आवडली नसल्याचे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी सध्या केरळ दौऱ्यावर असून त्यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली.
मध्यप्रदेश: कमलनाथ यांच्या 'त्या' आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राहुल गांधी नाराज
- उस्मानाबाद - तालुक्यातील एका खेडेगावात दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीची प्रकृती खालावली असून, सदरील मुलीच्या पालकांनी तिला प्रथम उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.
अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; गुन्हा दाखल करण्याची आमदाराची मागणी
- नवी दिल्ली / गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे देशभर पडसाद उमटले. या घटनेतील पीडिता ही वाल्मिकी या दलित समुदायातील होती. या समाजातल्या ५० कुटुंबातील २३६ नागरिकांनी हाथरस घटनेनंतर दुखी होऊन बौद्ध धर्म स्वीकारला आहे. गाझियाबादमधील करहेडा परिसरात ही धर्मांतराची घटना घडली.
हाथरस घटनेच्या धक्क्यानंतर वाल्मिकी समुदायातील २३६ नागरिकांनी केले धर्मांतर
- त्रिपोली - लिबियाची राजधानी त्रिपोलीच्या दक्षिणेस सुमारे 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेरहुना शहरात सामूहिक थडग्यांमधून 12 अज्ञात मृतदेह आढळल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. हे मृतदेह ताब्यात घेत असल्याचे लिबियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.