- मुंबई - राज्यात शनिवारी नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली आहे. शनिवारी तब्बल २६ हजार ४४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.७६ टक्के इतके झाले आहे. तर यासोबतच राज्यात शनिवारी ११ हजार ४१६ नविन कोरोनाबाधितांचे निदान झाले. तर ३०८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. राज्यातील एकूण बाधितांची संख्या १५ लाख १७ हजार ४३४ इतकी झाली आहे. सध्या २ लाख २१ हजार १५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात विक्रमी २६ हजारांहून अधिक जणांची कोरोनावर मात; रुग्ण बरे होण्याचा दर ८३ टक्क्यांवर
- पाटणा - बिहारमधील हाथरस जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने हातात घेतला आहे. आत्तापर्यंत विशेष तपास पथकाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येते होता. मात्र, आज तपासाची सूत्रे केंद्रीय अन्वेषण विभागाने हाती घेतली आहेत. या बलात्कार आणि हत्येच्या घटनेचे देशभर पडसाद उमटले होते. हाथरस घटनेचा तपास सीबीआयकडून व्हावा, अशी शिफारस मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्राकडे केली होती. त्यानुसार तपास सीबीयायकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द
- ग्वाल्हेर - मध्यप्रदेशातील सिंधिया मराठा राजघराण्यातील राजमाता विजया राजे सिंधिया यांची १२ ऑक्टोबरला जन्मशताब्दी आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केंद्र सरकार राजमाता विजया राजे सिंधिया यांचे छायाचित्र असलेले १०० रुपयांचे नाणे जारी करणार आहे. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. मोदींच्या हस्ते या नाण्याचे अनावरण होणार आहे.
मराठा राजघराण्याचा गौरव; विजयाराजे सिंधियांच्या सन्मानार्थ १०० रुपयांचे नाणे जारी
- मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज भेट घेतली. पवार यांच्याशी आज सकाळी 'सिल्वर ओक' बंगल्यावर आपली ही भेट झाली असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करून दिली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. या भेटीदरम्यान राज्यातील आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक राजकीय विषयांवर चर्चा झाली. विशेषत: बिहारमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये बरीच चर्चा झाली आहे.
संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय घडामोडींवर दीड तास चर्चा
- पाटणा (बिहार) - पाटणा रेल्वे स्थानकावर 5 कोटी रुपये किंमतीचे सोने व 27 लाख रुपये किंमतीची चांदी जप्त करण्यात आली आही. सोने शालीमार एक्सप्रेसमधून जीआरपीच्या पथकाने जप्त केले आहे. तर चांदी श्रमजीवी एक्सप्रेसमधून सीआरपीएफच्या पथकाने जप्त केली आहे.
पाटणा रेल्वे स्थानकातून 5 कोटींचे सोने अन् 27 लाखांची चांदी जप्त, दोन एक्सप्रेस रेल्वेतील कारवाई
- नवी दिल्ली - बिहारमध्ये टोकाचे ध्रुवीकरण झालेल्या वातावरणात, असे दिसते की, राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) निवडणुकीच्या बुद्धिबळपटावर असे काही सावधगिरीचे डावपेच आखले आहेत की, यादव किंवा मुस्लिमानांनी कोणताही निर्णय घेतला तर तो भाजपला सर्वाधिक लाभदायक ठरणार आहे. राज्यातील विविध जातीच्या मतदारांशी असलेल्या संबंधांची रचना दाखवणारी आकृती ही बहुआयामी आहे, ज्यामुळे मुस्लिम किंवा यादवांचे संपूर्ण एकगठ्ठा मतदान एनडीएविरोधात वळवणे अवघड होणार आहे.
बिहार निवडणूकः जदयूच्या विभाजनवादी राजकारणाचा एनडीएला कसा होणार फायदा?
- नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या हाथरस बलात्कार प्रकरणानंतर देशभरातील वातावरण तापले आहे. यानंतर महिला सुरक्षासाठी गृह मंत्रालयाने कठोर पाऊले उचलली आहेत. आज गृह मंत्रालयाने महिला सुरक्षेसंबंधीत तीन पानांचे परिपत्रक राज्य सरकारांना जारी केले आहे. बलात्काराप्रकरणी तक्रार दाखल करणे अनिवार्य असून आयपीसी आणि सीआरपीसी नियामांचे पालन राज्य सरकारने करावे. तसेच गैरजबाबदारपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात यायला हवी, असे गृह मंत्रालायने म्हटलं आहे.
महिला सुरक्षासाठी गृह मंत्रालयाची कठोर पाऊले, राज्यांना केल्या 'या' सूचना
- नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. काँग्रेसकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सोपवण्यातआली आहे. तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्टार प्रचारकांमध्ये कन्हैया कुमार, जेएनयूचे विद्यमान अध्यक्षा आयेशा घोष, माजी अध्यक्ष आशुतोष कुमार यांच्यासह 30 जणांचा समावेश आहे.
बिहार विधानसभा निवडणूक : कन्हैया कुमार करणार 'या' पक्षाचा प्रचार
- मुंबई - आपल्या सदाबहार सौंदर्याने आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे रेखा. त्यांचा जन्म १० ऑक्टोंबर १९५४ साली चेन्नई येथे झाला होता. हिंदीचा कोणताही लवलेश नसताना त्यांनी आपल्या मेहनतीच्या आणि अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, सुरुवातीच्या काळात त्यांनाही बरेच चढ-उतार पाहावे लागले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात हे काही खास किस्से...रेखा या सुप्रसिद्ध अभिनेते जेमिनी गणेशन यांची मुलगी आहेत. त्यांची आई पुष्पावल्ली यादेखील तेलुगू अभिनेत्री होत्या. त्यामुळे रेखा यांना बालपणीच अभिनयाचं बाळकडू मिळालं होतं.
वाढदिवस विशेष : चाहत्यांच्या मनावर आधिराज्य करणारी सदाबहार रेखा
- अबुधाबी - शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात कोलकाताने पंजाबला २ धावांनी पराभूत केले. कर्णधार केएल राहुल (७४) व मयांक अग्रवाल (५६) यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावत दिलेल्या शतकी सलामीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती. पण केकेआरच्या गोलंदाजांनी अखेरच्या तीन षटकात टिच्चून मारा करत सामना जिंकला. पंजाबला शेवटच्या चेंडूवर सामना सुपर ओव्हरमध्ये नेण्यासाठी षटकाराची गरज होती, मॅक्सवेलने चेंडू टोलावलाही पण तो चेंडू अवघ्या एका इंचाने सीमा रेषेजवळ पडला आणि त्या चेंडूवर पंजाबला केवळ चारच धावा मिळाल्या अन् केकेआर हा सामना दोन धावांनी जिंकला.
KKR vs KXIP : रोमांचक सामन्यात केकेआरची पंजाबवर २ धावांनी मात