ETV Bharat / bharat

Top 10 @ 9 PM : रात्री नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या..! - आजच्या ठळक बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top ten news
Top 10 @ 9 PM : रात्री नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या..!
author img

By

Published : Sep 29, 2020, 5:38 PM IST

Updated : Sep 29, 2020, 10:05 PM IST

  • जळगाव - भाजपाचे माजीमंत्री एकनाथ खडसे यांची एका कार्यकर्त्यासोबत झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये 'आपण महिनाभरात भाजपा सोडणार असून, दुसऱ्या पक्षात काय पद मिळते, केवळ याची प्रतीक्षा आहे', असा संवाद खडसेंनी कार्यकर्त्यासोबत केला आहे. या ऑडिओ क्लिपमुळे खडसेंच्या पक्षांतराची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, एकनाथ खडसे यांनी पक्षांतराचा इन्कार केला असून, कार्यकर्ते आपल्याला अशा प्रकारची विचारणा करतच असतात, असे त्यांनी सांगितले.

एकनाथ खडसे महिनाभरात भाजपा सोडणार? कार्यकर्त्यासोबत झालेल्या संवादाची 'ऑडिओ क्लिप व्हायरल'

  • मुंबई - राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागात ८ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचे 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेत आरोग्य सर्वेक्षण झाले आहे. एकूण सुमारे २४ लाख कुटुंबाना पथकांनी भेटी दिल्या असल्याचे ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) या मोहिमेच्या जिल्हा परिषदामार्फत होत असलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी या मोहिमेला अधिक परिणामकारक करा तसेच अधिकाधिक लोकांना यात सहभागी करून घ्या, असे सांगितले.

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम केवळ शासनाची नाही तर लोकांची - मुख्यमंत्री

  • मुंबई - कोरोना असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. त्यानंतर आता येत्या १७ ऑक्टोबरपासून सुरू होणारा नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्याबाबत राज्याच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून या वर्षीच्या नवरात्रीत गरबा, दांडिया खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे.

यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणाने; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरबा, दांडिया नाही

  • सोलापूर (पंढरपूर) - केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा एकही आमदार किंवा खासदार नाही त्यामुळे त्यांच्या मताला किंमत नाही, असे म्हणत शरद पवार यांनी आठवले यांची खिल्ली उडवली. शरद पवारांनी एनडीएसोबत यावे त्यांना जास्त चांगले पद मिळेल, असे वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी केले होते.

'आठवलेंचा एकही आमदार किंवा खासदार नाही, त्यामुळे त्यांच्या मताला किंमत नाही'

  • ठाणे - वाहतूक कोंडी, प्रदूषण, खड्डे अशा नागरी समस्यांची बजबजपुरी झालेल्या ठाण्यात आता मरणही महाग झाले आहे. शहरातील ३७ स्मशानभूमींत ठेकेदारांकडून गोरगरीब मृतांच्या नातेवाईकांची लूट चालवलेली आहे. प्रत्येक सरणामागे तीन हजारांची वसुली या ठेकेदारांकडून केली जात असून दुसरीकडे मुंबई पालिकेतील स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कार मोफत केले जातात. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही अंत्यसंस्कार मोफत करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे.

ठाण्यात मरणही झाले महाग, स्मशानभूमीतील लाकडांचा दर अव्वाच्या सव्वा

  • पुणे - देहूरोडच्या मामुर्डी येथे विवाहबाह्य संबंधातून पत्नी आणि प्रियकराने मिळून पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित पत्नीला ताब्यात घेण्यात आले आहे. तर, तीन प्रियकरांची कसून चौकशी देहूरोड पोलीस करत आहेत. मयूर गोविंद गायकवाड (वय 28, रा. मामुर्डी) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

विवाहबाह्य संबंधातून पत्नीने केला पतीचा खून, देहूरोड येथील घटना

  • मुंबई - पुणे ‘स्मार्टसिटी’ अंतर्गत होणारी कामे दर्जेदार तसेच मुदतीत पूर्ण होतील याची दक्षता घ्या. लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्यानुसार अंमलबजावणी करा. हे करताना पुणे 'स्मार्ट सिटी'चे रँकिंग राष्ट्रीय पातळीवर कसे सुधारेल यासाठीही आपला प्रयत्न असला पाहिजे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

पुणे 'स्मार्ट सिटी'ची कामे वेळेत पूर्ण करा - उपमुख्यमंत्री

  • कोलकाता - भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. गांगुलीच्या टीकाकारांनी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना आयपीएल फ्रेंचायझीच्या कर्णधाराला मदत करत असल्याचा आरोप केला. मात्र, गांगुलीने हा आरोप फेटाळून लावला. गांगुली म्हणाला, ''मी भारतासाठी जवळपास ५०० सामने खेळलो आहे. त्यामुळे मी युवा खेळाडूशी बोलू शकतो किंवा त्याला मदत करू शकतो, मग तो श्रेयस अय्यर असो किंवा विराट कोहली. जर त्यांना मदत हवी असेल तर मी करू शकतो.''

''भारतासाठी ५०० सामने खेळलोय, श्रेयस काय विराटलाही मी सल्ला देऊ शकतो''

  • पुणे - जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात ज्येष्ठ सिनेअभिनेते विक्रम गोखले यांचा जामीन पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह जयंत म्हाळगी आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल होता. पुण्याजवळील गिरीवन प्रकल्पात मुळशी तालुक्यातील जमीन विक्रीत फसवणूक झाल्याचे हे प्रकरण आहे. यामुळे विक्रम गोखले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

जमीन खरेदी फसवणूक : अभिनेते विक्रम गोखले यांचा जामीन फेटाळला

Last Updated : Sep 29, 2020, 10:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.