- मुंबई - महाराष्ट्रात आज २३ हजार ५०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ८ लाख ५७ हजार ९३३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.२२ टक्के झाले आहे. मागील २४ तासामध्ये राज्यात २१ हजार ९०७ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागील २४ तासांमध्ये ४०५ मृत्यूंची नोंद झाली आहे.
सविस्तर वाचा - राज्यात 23 हजार 501 रुग्णांना डिस्चार्ज; आतापर्यंत 8 लाख 57 हजार 933 रुग्ण कोरोनामुक्त
- कोल्हापूर - कोरोनामुळे माणुसकीचासुद्धा अंत झाला हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. संसर्गाच्या भीतीने जवळचे नातेवाईक आणि कुटुंबीयसुद्धा मृतदेह स्वीकारायला तयार नव्हते अशी अनेक उदाहरणे आहेत. अशाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोल्हापुरातील बैतुलमाल कमिटीचे मुस्लीम बांधव पुढे आले आहेत. पाहुयात यावरचा स्पेशल रिपोर्ट...
सविस्तर वाचा - तुम जमींवालो पर रहम करो..ऊपरवाला आपपर रहम करेगा; 'त्यांनी' 200 कोरोना मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार
- देशासह राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ११ लाखांच्या वर पोहोचली आहे. तर एकूण मृतांची संख्याही 30 हजारांच्या वर पोहोचली आहे. काही ठिकाणी पुरेसा ऑक्सिजन आहे तर काही ठिकाणी अनेक रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत 'ईटीव्ही भारत'ने राज्यातील कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या रुग्णालये, कोविड सेंटर्समधील ऑक्सिजनची परिस्थिती कशी आहे? याबाबत घेतलेला आढावा.
सविस्तर वाचा - कोरोनाचं महासंकट अन् महाराष्ट्रातील ऑक्सिजनची परिस्थिती
- मुंबई - राज्यासह मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मात्र, रुग्णसंख्या बरे होण्याचेही प्रमाण वाढत आहे. आज (शनिवारी) मुंबईत 5 हजार 105 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर 2 हजार 211 नविन बाधितांची नोंद झाली आहे. तर 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 41 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 37 पुरुष तर 13 महिला रुग्ण आहेत.
सविस्तर वाचा - मुंबई कोरोना अपडेट : शनिवारी तब्बल 5 हजार 105 रुग्णांची कोरोनावर मात, नविन 2 हजार 211 रुग्णांची नोंद
- बुलडाणा- लोणार तालुक्यातील हिरडव येथे पत्नीचा खून करून फरार झालेल्या दारूड्या पतीचा मृतदेह आढळला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पळसखेड शिवारातील एका लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत होता. ही घटना आज उघडकीस आली.
सविस्तर वाचा - पत्नीचा खून करून फरार झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत
- अबुधाबी - आयपीएलच्या तेराव्या हंगामाला आजपासून सुरूवात झाली असून सलामीचा सामना दोन तगड्या संघांमध्ये रंगत आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज लीगच्या पहिल्या सामन्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. नाणेफेक जिंकून चेन्नईने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
सविस्तर वाचा - CSKvsMI LIVE : चेन्नईला ४१ चेंडूत ६३ धावांची गरज, रायडूचे अर्धशतक
- मुंबई - मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यात सुरू असलेले आंदोलने आणि मराठा समाजाची एकूणच आक्रमक भूमिका लक्षात घेऊन त्यासंदर्भात काय उपाययोजना करता येतील यासाठी आज (दि.19 सप्टें.) वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बरीच खलबते झाली.
सविस्तर वाचा - वर्षा निवासस्थानी शरद पवार अन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात 'या' विषयी खलबते
- नवी दिल्ली - सध्या चीन-भारत सीमेवर तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांनी आपले सैन्यांना सीमेवर तैनात केले आहे. यातच दिल्ली विशेष पथकाने एक चिनी महिला, तिचा नेपाळी सहकारी आणि एका मुक्त पत्रकारास चीनसाठी हेरगिरी करण्यावरून अटक केली आहे. राजीव शर्माने असे या पत्रकाराचे नाव असून त्याने चिनी गुप्तचर संस्थांना देशाच्या सुरक्षेशी निगडीत संवेदनशील माहिती पूरवल्याचा आरोप दिल्ली पोलीस विशेष पथकाने केला आहे.
सविस्तर वाचा - चीनला गुप्त माहिती पुरवल्याप्रकरणी दिल्लीतील पत्रकारास अटक
- हिंगोली- शेतकऱ्यांसमोर नेहमी नवनवे संकट उभे राहतात. अशाच विदारक परिस्थितीमध्ये हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनचे पीकही नियमित सुरू असलेल्या पावसामुळे हातचे जाण्याच्या मार्गावर आहे. आज घडीला शेतशिवारात गुडघाभर पाणी असल्याने अवघ्या १५ ते २० दिवसांवर काढणीयोग्य आलेले सोयाबीन हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
सविस्तर वाचा - हिंगोली जिल्ह्यात संततधार पावासामुळे सोयाबीन मातीमोल, पंचनाम्याची मागणी
- औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. शहरातील सर्वच रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांना प्रतीक्षा यादीत राहण्याची वेळ आली आहे. त्यात ऑक्सिजनची मागणी वाढली असून त्या मानाने पुरवठा कमी पडत असल्याचे शहरात दिसून येत आहे.
सविस्तर वाचा - कोरोनामुळे ऑक्सिजनच्या मागणीत वाढ, घरी सिलेंडर नेणाऱ्यांच्या संख्येतही भर