ETV Bharat / bharat

Top 10 @ 5 PM : सायंकाळी पाचच्या ठळक बातम्या! - पाचच्या बातम्या

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रांतील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Top ten news stories at five PM
Top 10 @ 5 PM : सायंकाळी पाचच्या ठळक बातम्या!
author img

By

Published : Jun 7, 2020, 5:00 PM IST

  • जळगाव - जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा (कोविड रुग्णालय) भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. यापूर्वी पॉझिटिव्ह रुग्ण कक्षातून बाहेर पडणे, अहवाल येण्यापूर्वीच रुग्णांना डिस्चार्ज देणे असे प्रकार घडलेले आहेत. अशातच भुसावळ येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेली ८५ वर्षीय वृद्ध महिला मागील चार दिवसांपासून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सविस्तर वाचा - कोविड रुग्णालयाचा भोंगळ कारभार, भुसावळची ८५ वर्षीय पॉझिटिव्ह वृद्धा बेपत्ता

  • मुंबई - कोकण किनारपट्टीसह इतर काही जिल्ह्यांमध्ये चार दिवसांपूर्वी निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातले. या वादळामुळे रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे, पुणे, नाशिक आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये शाळांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. या शाळांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.

सविस्तर वाचा - चक्रीवादळामुळे पडझड झालेल्या शाळांचे तातडीने पंचनामे करा, वर्षा गायकवाड यांचे आदेश

  • पुणे - भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांनी पुण्याच्या जलवाहिनीवरील मोर्चा स्थगित करुन गावागावांत कुटुंबासह जलसमाधी घेणार असल्याचे सांगितले. आज (रविवार) देवतोरणे, कुदळवाडी गावातील धरणग्रस्त शेतकरी संपुर्ण कुटुंबासह भामा-आसखेड धरणाच्या पाण्यात उतरले आहेत.

सविस्तर वाचा - भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकरी कुटुंबासह जलसमाधीच्या तयारीत

  • मुंबई- आरे जंगलात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा मोठ्या प्रमाणात झाडे कापत वा जाळत झोपड्या बांधल्या जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला. मात्र, आरेत कुठेही अतिक्रमण होत नसल्याचे म्हणत आरे कॉलनी प्रशासनाने आरोप धुडकावून लावला आहे.आता यावरून प्रशासन आणि पर्यावरणप्रेमी असा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा - आरेत झाडे तोडत अतिक्रमण! पर्यावरणप्रेमींचा आरोप; प्रशासनाचा मात्र इन्कार

  • सिंधुदुर्ग - कुडाळ पिंगुली येथील ठाकर आदिवासी लोक कलावंत शिवदासकुमार गणपत मस्के या तरुणाने कळसूत्री बाहुल्यांच्या व्हिडिओमधून कोरोनाशी कसे लढाल, यावर प्रबोधन करण्याचा नवा उपक्रम सुरू केला आहे. कळसूत्री बाहुल्यांचा खेळ हा लोककलेतील एक प्रभावी व लोकप्रबोधनकारी खेळ मानला जातो.

सविस्तर वाचा - कोरोनाविरुद्ध कसे लढाल.. लोक कलावंताचे कळसूत्री बाहुल्यांच्या व्हिडिओतून प्रबोधन

  • बेळगाव (कर्नाटक) - जिल्ह्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या आणि सामुहिक प्रसार झालेले हिरेबागेवाडी गाव हे कोरोनामुक्त झाले आहे. या गावातील लोकांनी फटाके फोडून याचा आनंद साजरा केला.

सविस्तर वाचा - बेळगाव जिल्ह्यातील 'हे' गाव अखेर कोरोनामुक्त

  • नवी दिल्ली- राज्यसभा सदस्य निवडणूक जवळ आली असताना गुजरातमधील काही काँग्रेस आमदारांनी राजीनामे दिले आहेत. मात्र, आम्हाला राज्यातील राज्यसभेची दुसरी जागा जिंकण्यासाठी एका मताची गरज असल्याचा दावा गुजरात काँग्रेसचे प्रभारी राजीव सातव यांनी केला. त्यांनी या विषयी अधिक बोलण्यास नकार दिला आहे.

सविस्तर वाचा - गुजरातमधील राज्यसभेची दुसरी जागा जिंकण्यासाठी एका मताची गरज; काँग्रेसचा दावा

  • ब्राझिलिया - ब्राझील सरकारने कोरोनासंबंधित माहिती आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून हटवली आहे. ब्राझिलचे अध्यक्ष जेर बोल्सनारो देशात कोरोनाचा उद्रेक रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत जगभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यामुळे ही माहिती हटवली गेली असल्याचे बोलले जात आहे.

सविस्तर वाचा - ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने संकेतस्थळावरून हटवली कोरोनाबाबतची माहिती

  • वॉशिंग्टन - वॉशिंग्टनच्या रस्त्यावर शनिवारी हजारो अमेरिकन नागरिकांनी जॉर्ज फ्लॉईड मृत्यू प्रकरणी पोलिसांची निषेध केला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत जॉर्ज फ्लॉईड याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, याचाच निषेध करण्यासाठी नागरिक वॉशिंग्टनच्या रस्त्यावर उतरले होते.

सविस्तर वाचा - जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूप्रकरणी 'व्हाइट हाऊस'जवळ हजारो नागरिकांची निदर्शने

  • भोपाळ : मध्य प्रदेशच्या राजधानीमध्ये असणाऱ्या वन विहार राष्ट्रीय उद्यानातील एका वाघाला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्याला कारण म्हणजे, या वाघाची वारंवार मानवी वसाहतीत जाण्याची सवय. सारन असे या वाघाचे नाव आहे. २०१८च्या डिसेंबरमध्ये त्याला पहिल्यांदा पकडण्यात आले होते, जेव्हा तो महाराष्ट्रातील एका मानवी वसाहतीमध्ये शिरला होता.

सविस्तर वाचा - वारंवार मानवी वसाहतीत जाणाऱ्या वाघाला केले 'क्वारंटाईन'!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.