मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेला लॉकडाऊन अयशस्वी झाल्याचा दावा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येणाऱ्या एका 43 वर्षीय व्यक्तीने पालिकेच्या नायर रुग्णालयात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बॉलीवूड चित्रपट निर्माते अनिल सुरी यांचे कोरोना आणि हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. यासह महत्वाच्या टॉप-१० घडामोडी वाचा...
- नवी दिल्ली - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही २३ मार्चला लॉकडाऊनची घोषणा केली. यानंतर आता टाळेबंदीचा पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यापासून लॉकडाऊनमधील शिथिलता वाढवण्यात आली. मात्र, हे लॉकडाऊन अयशस्वी झाल्याचा दावा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. यासाठी त्यांनी स्पेन, जर्मनी, इटली, ब्रिटनसह भारताचा आलेख शेअर केलाय.
सविस्तर वाचा - 'लॉकडाऊन अयशस्वी', राहुल गांधींच्या ट्वीटमध्ये प्रगत देशांचे आलेख
- अहमदनगर - काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात न्याय योजना मांडली होती. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ती योजना अंमलात आणणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी काँग्रेस आजही आग्रही असल्याचा विचार काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
सविस्तर वाचा - देश पातळीवर 'न्याय' योजनेच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेस आजही आग्रही - बाळासाहेब थोरात
- मुंबई - कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येणाऱ्या एका 43 वर्षीय व्यक्तीने पालिकेच्या नायर रुग्णालयात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कोरोनाची लागण झाल्याच्या भीतीने हा रुग्ण मानसिक तणावाखाली होता. या रुग्णाने बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असून, या प्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत कोरोनाच्या रुग्णाने केलेली ही तिसरी आत्महत्या आहे.
सविस्तर वाचा - कोरोनाग्रस्त रुग्णाची नायर रुग्णालयात आत्महत्या; मुंबईत कोरोना रुग्णाची तिसरी आत्महत्या
- सिंधुदुर्ग - इको-सेन्सिटिव्ह झोनची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच झोनमधून सिंधुदुर्ग जिल्हातील 86 गावे वगळण्यात आली आहेत. त्यात सावंतवाडी तालुक्यातील 50 पैकी 30 गावांचा समावेश आहे. तर दोडामार्ग तालुका कस्तुरीरंगन समितीने वगळला आहे. हा पट्टा इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट करावा, यासाठी वनशक्ती संस्था न्यायालयीन लढा देत आहे. सध्या हा लढा प्रलंबित असतानाच इको-सेन्सिटिव्ह झोनमधून राज्य शासनाने सावंतवाडीसह अन्य चार तालुक्यातील गावे वगळली आहेत. त्यामुळे पर्यावरणवाद्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.
सविस्तर वाचा - इको-सेन्सिटिव्हमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 86 गावे वगळली, पर्यावरणप्रेमींचा विरोध
- मुंबई - बॉलीवूड चित्रपट निर्माते अनिल सुरी यांचे मुंबईत निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. अनिल सुरी यांचं बंधू राजीव सुरी यांनी ही माहिती दिली. गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांचे कोरोना आणि हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, असे राजीव सुरी यांनी सांगितले.
सविस्तर वाचा - बॉलिवूडला आणखी एक धक्का, निर्माते अनिल सुरी यांचे निधन
नागपूर - वडिलांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार करणारा नराधम तसेच तिचा गर्भपात करणाऱ्या आईसह परिचरिकेला अटक करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात ही घटना घडली.
सविस्तर वाचा - अल्पवयीन दिव्यांग मुलीवर आधी अत्याचार, नंतर गर्भपात; आईसह नराधम अन् परिचरिका गजाआड
- जम्मू - यावर्षीची अमरनाथ यात्रा पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. हिमालयीन पर्वतरांगेत चालणारी ही यात्रा २१ जुलै ते ३ ऑगस्ट अशी एकूण १५ दिवस सुरू राहणार आहे. श्री अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या वतीने याची माहिती देण्यात आली आहे. जम्मूच्या अनंतनाग जिल्ह्यात समुद्रसपाटी पासून ३८८० मीटर उंचीवरील अमरनाथ गुहा मंदिरात या यात्रेचे आयोजन केले जाते. यंदाच्या यात्रेची प्रथम पूजा शुक्रवारी संपन्न झाली. त्यावेळी अमरनाथ यात्रा बोर्डाच्या वतीने ही माहिती देण्यात आली.
सविस्तर वाचा - अमरनाथ यात्रा २१ जुलैपासून होणार सुरू, १५ दिवसाच्या यात्रेसाठी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक
- शाजापूर (मध्यप्रदेश) - शहरातील एका रुग्णालयात मानवतेला लाजवणारा प्रकार समोर आला आहे. उपचारानंतर फी भरण्यासाठी पैसे नसल्याने एका ८० वर्षांच्या वृद्धाला बेडला बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. जवळील सर्व पैसे उपचारासाठी खर्च केले. आता उर्वरित पैसे भरण्याची ऐपत नसल्याने रुग्णालय प्रशास डिस्चार्ज देत नसल्याचा आरोप रुग्णाच्या मुलीने केला आहे. यासाठी वडिलांना दोरीने बांधून ठेवल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पाच दिवसांपासून रुग्णांला बांंधून ठेवले असून आमचे ऐकण्यास कोणीही तयार नसल्याचे त्या म्हणाल्या.
सविस्तर वाचा - उपचाराचे पैसे न दिल्याने ८० वर्षांच्या रुग्णाला बांधले बेडला; मध्यप्रदेशातील धक्कादायक घटना
- मुंबई - लॉकडॉऊनचा पाचवा टप्पा सुरू झाल्यानंतर राज्य शासनाकडून तब्बल तीन महिन्यानंतर मुंबईत काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. छोट्या मोठ्या गोष्टींच्या खरेदीसाठी मुंबईतले गजबजलेल ठिकाण म्हणजे क्रॉफर्ड मार्केट. आशियातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची बाजारपेठ, सोन्याच्या दागिन्यांची दुकाने, गृहपयोगी वस्तू मिळणाऱ्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये सम आणि विषम अशा पॅटर्न नुसार दुकाने उघडण्यात आलेली आहेत. लॉकडाऊच्याआधी दरदिवशी शेकडो कोटींची उलाढाल होत असलेले क्रॉफर्ड मार्केट तब्बल तीन महिने बंद होते. आता क्रॉफर्ड मार्केट हे पुन्हा चालू झाल्यामुळे येथे ग्राहकांची थोडी फार गर्दी पाहायला मिळत आहे.
सविस्तर वाचा - अनलॉक 1: मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केट काही प्रमाणात सुरू, ग्राहकांची गर्दी
- मुंबई - कोरोनामुळे उद्भभवलेल्या परिस्थितीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. या काळात अनेकांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागले आहे. पण अशा काळात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने घर बसल्या ३ कोटींपेक्षा जास्त रक्कम कमावली आहे.
सविस्तर वाचा - लॉकडाउन काळातही विराटने कमावले कोट्यावधी रुपये, कसे ते जाणून घ्या...