ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकरा पर्यंतच्या ठळक बातम्या! - undefined

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोनासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा एका क्लिकवर...

top Ten 11 PM
top Ten 11 PM
author img

By

Published : Nov 23, 2020, 11:00 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि बीएमसीमधील वाद परत चर्चेत आला आहे. महापालिकेने कंगना रणौत यांच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईविरुद्धच्या याचिकेवर 27 नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालय निकाल देणार आहे.

सविस्तर वाचा - कंगना रणौत कार्यालय तोडक कारवाई : मुंबई उच्च न्यायालय 27 नोव्हेंबरला देणार निकाल

परभणी - महामारीसारख्या कठीण परिस्थितीत नागरिकांना महाविकास आघाडी सरकारने कोणतीही सवलत दिली नाही. उलटपक्षी नागरिकांच्या जखमेवर वाढीव वीजबिले देऊन मीठ चोळण्याचे काम केल्याची टीका विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. आता ही वाढीव बिले कशी योग्य आहेत, हे समजावून सांगत वसुलीचा तगादा लावणारे हे सरकार जनतेचे रक्त शोषणाचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरेकर यांच्या नेतृत्वात परभणीच्या जिंतूर रोडवरील वीज महामंडळाच्या कार्यालयापुढे वाढीव बिलाची होळी करत भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

सविस्तर वाचा - 'हे तर जनतेचं शोषण'... परभणीत भाजपातर्फे वीज बिलांची होळी

मुंबई - आज राज्यात ४ हजार १५३ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १७ लाख ८४ हजार ३६१ वर पोहोचला आहे. राज्यात आज ३० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४६ हजार ६५३ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६१ टक्के आहे. राज्यात आज एकूण ८१ हजार ९०२ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सविस्तर वाचा - राज्यात दिवसभरात ४ हजार १५३ नवे कोरोना पॉझिटिव्ह, ३० रुग्णांचा मृत्यू

ठाणे - ठाण्यातील राबोडी परिसरात मनसेच्या पदाधिकाऱ्याची डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामागे राजकीय वैमनस्य आहे, की दुसरे कारण, याचा शोध ठाणे पोलीस घेत आहेत. आज दुपारच्या सुमारास ही हत्या झाली. जमील शेख, असे हत्या करण्यात आलेल्या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

सविस्तर वाचा - ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्याची डोक्यात गोळी झाडून हत्या

रत्नागिरी - स्थानिक प्रशासनाने शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णयाचा पुनर्विचार करावा, असा सल्ला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार सर्वत्र शाळा सुरू होत आहेत. यावरून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत पुन्हा विचार करावा, असे सामंत म्हणाले.

सविस्तर वाचा - 'शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने पुनर्विचार करावा', मंत्री उदय सामंतांचा सल्ला

मुंबई - ऑगस्ट महिन्यातील धार्मिक सणांनंंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. ऑक्टोबर महिन्यापासून पुन्हा रुग्ण संख्या आटोक्यात आली. मात्र, आता पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. 16 नोव्हेंबरला रुग्ण संख्या 409 पर्यंत खाली आली होती. गेल्या आठवडाभरात त्यात दुप्पटीहून अधिक वाढ झाली. आज मुंबईत कोरोनाचे 800 नवे रुग्ण आढळून आले असून 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर वाचा - मुंबईत कोरोनाचे 800 नवे रुग्ण, 14 रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली - आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आसामचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली.

सविस्तर वाचा - आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निधन

कोल्हापूर - अंबाबाईच्या भक्तांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने एक आनंदाची बातमी दिली आहे. अंबाबाईच्या दर्शनाच्या वेळेत आता वाढ करण्यात आली आहे. सकाळी 9 ते 12 या वेळेत मिळणारे दर्शन आता सकाळी 7 ते 12 या वेळेत मिळणार आहे. तर, सायंकाळी 4 ते 7 या वेळेत सुद्धा भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला असून एकाच वेळी गर्दी होऊ नये, शिवाय दर्शन अधिक सुलभ व्हावे यासाठी दर्शनाची वेळ वाढवण्यात आली आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सविस्तर वाचा - अंबाबाईच्या भक्तांना आनंदाची बातमी; दर्शनाची वेळ वाढवली, ई पास सुद्धा मिळणार

मुंबई - मुंबईतल्या गोवंडी परिसरातून गेल्या 11 महिन्यात 21 तरुणी बेपत्ता झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे, बेपत्ता झालेल्या तरुणी जातात कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी आज भाजप नेते किरीट सोमैया यांनी गोवंडी पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस निरीक्षकांशी चर्चा केली. यावेळी सोमैया यांनी या बेपत्ता मुलींचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी केली.

सविस्तर वाचा - मुंबई पोलीस काहीतरी लपवतंय.. 'त्या' 21 बेपत्ता मुलींचा तातडीने शोध घ्यावा- किरीट सोमैया

हिंगोली - राज्यात जेव्हापासून महाविकास आघाडी सत्तेत आली आहे. तेव्हापासून भाजपाकडून वारंवार सरकार पाडण्यासंदर्भातील वक्तव्ये केली जात आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील आज पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे भाकित केले आहे. जोपर्यंत जनतेचा मूड आहे तोपर्यंत सर्व काही ठीक आहे. या सरकारकडून वर्षभरातच जनतेची फार निराशा झालेली आहे. एवढेच नव्हे तर, हे सरकार अनैसर्गिक स्थापन झालेले आहे. या सरकारला जनतेचे कोणतेही प्रश्न सोडविण्यात यश आलेले नाही. बिहारच्या निवडणुकीवरून सर्वकाही परिस्थिती लक्षात आलेली आहे. त्यामुळे, येत्या काही दिवसांमध्ये हे सरकार पडणार असल्याची भविष्यवाणी दरेकर यांनी केली आहे.

सविस्तर वाचा - काही दिवसातच कोसळणार आघाडी सरकार; दरेकरांची हिंगोलीत भविष्यवाणी

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.