ETV Bharat / bharat

Top 10 @11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या... वाचा एका क्लिकवर - महत्त्वाच्या घडामोडी

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top-ten-news-stories-around-the-globe
Top 10 @11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या... वाचा एका क्लिकवर
author img

By

Published : Oct 5, 2020, 3:15 PM IST

Updated : Oct 5, 2020, 10:53 PM IST

  • पुणे - शासकीय कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह चार नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसह एकुण 36 जणांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास स्वारगेट येथील पाणीपुरवठा विभागात घडली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आमदार योगेश टिळेकर यांच्यासह नगरसेवक वीरसेन जगताप नगरसेविका रंजनाताई टिळेकर, उषा कामठे आणि राणी भोसले यांच्यासह 36 कार्यकर्त्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अषित वेदप्रकाश जाधव (56) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पाणीपुरवठा केंद्रात तोडफोड केल्याप्रकरणी भाजप आमदारांसह 36 जणांना अटक

  • नवी दिल्ली - कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेता 15 ऑक्टोबरनंतर केंद्र सरकारने राज्यांना शाळा आणि कोचिंग क्लास सुरू करण्याची परवानगी दिली आहे. शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

शाळा सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध

  • लातूर- ओबीसींच्या आरक्षणात इतर जाती समुहाचा समावेश करू नये, आम्हीच खरे ओबीसी, असे म्हणत आज निलंग्यात अठरापगड समाजाने पारंपरिक वेशात धरणे आंदोलन केले. इतर समाजाच्या लोकांना आमच्या हक्काच्या आरक्षणात स्थान देऊ नये, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अठरापगड समाजाने दिला.

'आम्हीच खरे ओबीसी' म्हणत निलंग्यात अठरापगड जातींचे धरणे आंदोलन

  • नागपूर - नेपाळ येथील तरुणीवर उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे बलात्कार झाल्याची तक्रार झाला. याप्रकरणी शहरातील कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. घटना ही उत्तर प्रदेशची आहे. मात्र, कोराडी पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

नेपाळी तरुणीवर उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये बलात्कार, नागपुरात तक्रार दाखल

  • मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजपर्यंत कधीही दलित अत्याचाराविरुद्ध एक शब्दही काढला नाही. दलित अत्याचाराविरुद्ध कधी ते पुढे आले नाहीत. दलित अत्याचार जिथे होईल तेथे मी पोहचलो आहे. दलित अत्याचाराविरुद्ध सतत लढत राहिलो आहे. दलित पँथरच्या चळवळीतून मी पुढे आलो आहे. त्यामुळे दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर नेहमी मूग गिळून बसणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी आम्हाला दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याचे शिकवू नये, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

'दलित अत्याचाराच्या प्रश्नांवर मूग गिळून बसणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये'

मुंबई - येथील पहिल्या भुयारी कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ मार्गिकेचे काम निर्धारित वेळेत पूर्ण झाले. यानंतर आता हा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचा चंग मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने बांधला आहे. त्यामुळेच भुयारीकरणाच्या कामाला आता वेग देण्यात आला आहे. आज (सोमवारी) भुयारीकरणातील आणखी एक महत्वपूर्ण टप्पा मेट्रो 3ने पार केला. यात सिद्धिविनायक ते दादर हा 1.10 किमीचा भुयारीकरणाचा टप्पा आज (रविवारी) 32व्या ब्रेक थ्रूच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी उपस्थित होते. यावेळी त्यांनी या कामाचे कौतुक केले.

मेट्रो-3मधील 32 वे ब्रेकथ्रू यशस्वी; सिद्धिविनायक ते दादर भुयारीकरण पूर्ण

  • मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचा एलजीबीटी सेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एल.जी.बी.टी समूहाला सामाजिक प्रवाहात सामावून घेण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून एल.जी.बी.टी ( लेस्बियन, गे, बायसेक्सुअल, ट्रान्सजेंडर) सेलची स्थापना करण्यात आली. आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सेलच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. एलजीबीटी समुदायाचा पक्षातंर्गत सेल करणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिलाच पक्ष ठरला आहे.

आदर्श! एलजीबीटी सेल सुरू करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पहिलाच पक्ष

  • नवी दिल्ली - चालू वर्षात २० हजार कोटी रुपयांचे जीएसटी मोबदला उपकराचे संकलन झाले आहे. हा उपकराचा निधी राज्यांना आज रात्री देण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्या ४२ व्या जीएसटी बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होत्या.

केंद्र सरकार राज्यांना २० हजार कोटींच्या मोबदला उपकर निधीचे करणार वितरण

  • मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री काजोल सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांचे नेहमी मनोरंजन करीत असते. तिने अलिकडेच शेअर केली इन्स्टाग्रामवरील पोस्ट त्याचे उत्तम उदाहरण आहे. तिने रविवारी एक फोटो पोस्ट केला होता. यात ती मास्क घातलेली दिसते. मॉलच्या स्वयंचलित जीन्यावरील (एलिवेटर) हा फोटो आहे.

काजोलचा 'चोर पोलीस' खेळण्याचा चाहत्यांना सल्ला

  • शारजाह - सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने मुंबईविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमारला 'रिप्लेस' केले. या सामन्यात कौल महागडा ठरला. मुंबईच्या फलंदाजांनी त्याच्या षटकात अनेक धावा वसूल केल्या. या हंगामात तो आतापर्यंत सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे.

आयपीएलमध्ये सिद्धार्थ कौलचा लाजिरवाणा विक्रम

Last Updated : Oct 5, 2020, 10:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.