ETV Bharat / bharat

Top 10 news @1pm : दुपारी १ वाजेपर्यंतच्या ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर - आजच्या ठळक घडामोडी

दुपारी १ वाजेपर्यंतच्या ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

top ten news  today top news  today top ten news  today etv bharat top ten news  दहा ठळक घडामोडी  आजच्या ठळक घडामोडी  आतापर्यंतच्या ठळक घडामोडी
Top 10 news @1pm : दुपारी १ वाजेपर्यंतच्या ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर
author img

By

Published : Jun 5, 2020, 1:02 PM IST

हैदराबाद - निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगडला रवाना झाले आहेत, तर मुंबई महापालिकेत कामावर येत नसलेल्या कर्मचाऱ्यांना अंतिम नोटीस देण्यात आली आहे. तसेच केरळमधील काडिनामकुलम येथे मित्रांनीच मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. शिवाय औरंगाबादेत एक मनोरुग्णाने वाघाच्या परिक्षेत्रात रात्र काढल्याची घटना समोर आली आहे.

मुंबई - मुख्यमंत्री बाहेर का पडत नाही? या विरोधकांच्या प्रश्नाला सडेतोड उत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शुक्रवारी रायगडला रोरो बोटीने रवाना झाले आहेत. आज या भागात त्यांचा दौरा असून ते ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात ते अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. यामध्ये वादळामुळे कोकणपट्ट्यातील झालेल्या सर्व नुकसानीबाबत चर्चा केली जाणार आहे.

वाचा सविस्तर - मुख्यमंत्री रायगडला रवाना, नुकसानग्रस्त भागाचा घेणार आढावा

मुंबई - कोरोना विषाणूचे संकट आले असताना मुंबई पालिका रुग्णालयातील कर्मचारी भीतीने कामावर येत नसल्याचे समोर आले आहे. या कामगारांना वारंवार सांगूनही ते कामावर हजर होत नसल्याने थेट कारवाईचा इशारा पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी दिला आहे. शेवटची संधी म्‍हणून ७२ तासांची अंतिम नोटीस देण्‍याचे आदेश दिले असून ही नोटीस साथरोग कायद्यानुसार व आपत्ती व्‍यवस्‍थापन कायद्यानुसार देण्‍यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, कारवाईनंतर रिक्त पदावर कंत्राटी कामगारांची नियुक्ती करा, असे आदेशही संबंधितांना दिले आहेत.

वाचा सविस्तर - मुंबई पालिका रुग्णालयातील गैरहजर कर्मचाऱ्यांना अंतिम नोटीस, रिक्त पदी कंत्राटी भरती

तिरुवनंतपूरम - देशभरात बलात्काराच्या अनेक घटना घडत आहेत. हा अत्याचार कधी अनोळखी व्यक्तीकडून होतो, तर कधी ओळखीच्या व्यक्तीकडून होतो. ओळखीच्या व्यक्तीकडून झालेला अत्याचार हा अधिक हादरा देणारा ठरत असावा. केरळमधील तिरुवनंतपूरम येथे असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काडिनामकुलम येथे मित्रांनीच आपल्या मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे.

वाचा सविस्तर - धक्कादायक! मित्राच्या पत्नीवर मित्रांकडून सामूहिक बलात्कार

औरंगाबाद - सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाच्या भिंतीवरून उडी मारत एक मनोरुग्ण चक्क वाघाच्या पिंजऱ्याजवळ पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत उघडकीस आला. वाघ पिंजऱ्यात बंदिस्त असल्याने अनर्थ टळला असून उद्यान कर्मचाऱ्यांनी या मनोरुग्णाला पोलिसांच्या स्वाधीन केले.

वाचा सविस्तर - वाघाच्या परिक्षेत्रात मनोरुग्णाने काढली रात्र, सुदैवाने वाचला जीव

नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये 9 हजार 851 कोरोनाबाधित आढळले असून 273 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाखांच्यापेक्षा अधिक झाला आहे. तर महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत.

वाचा सविस्तर - गेल्या 24 तासामध्ये देशात आढळले 9 हजार 851 कोरोनाबाधित

परभणी - लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे अनेकांचे जुळलेले विवाह रद्द झाले, तर काहींनी अगदी साधेपणाने विवाह उरकून घेत संसार सुरू केला आहे. आता यापुढे देखील हीच पद्धत अवलंबावी लागणार आहे. जिंतूर येथे एका मुलीला पाहण्यासाठी आलेल्या वराने जागेवरच पसंती देऊन मुलीसह विवाह करण्याची इच्छा दर्शवली. त्यावर दोन्ही परिवारांनी संमती देऊन लागलीच हा विवाह उरकून देखील घेतला. या 'लॉकडाऊन विवाहा'ची सर्वत्र चर्चा होत आहे.

वाचा सविस्तर - मुलगी पहायला आले अन् लग्न लावून नेले, जिंतूरात पार पडला हा 'लॉकडाऊन झटपट विवाह'

नवी दिल्ली - गुरुवारी रात्री मुसळधार पावसामुळे घराचे छप्पर कोसळल्याने उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यातील लालगंज भागात दोन वर्षांच्या मुलीसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेत 4 जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी वाराणसी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

वाचा सविस्तर - पावसामुळे घराचे छप्पर कोसळून 3 जण ठार तर 4 जखमी, मृतांमध्ये 2 वर्षाच्या चिमुकलीचा समावेश

मुंबई - केरळमध्ये २७ मे रोजी एक धक्कादायक घटना घडली. भुकेने व्याकुळ असलेल्या एका गर्भवती हत्तीणीला काही लोकांनी अननसातून फटाके खायला दिले. हे अननस हत्तीणीने खाल्ले. त्यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला. असह्य वेदनेसह ती तेथून पळाली आणि एका नदीत जाऊन उभी राहिली आणि अखेर आठवडाभराच्या संघर्षानंतर तिने प्राण सोडले. प्रसार माध्यमांमध्ये ही बातमी आल्यानंतर सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. क्रीडा विश्वातील अनेक खेळाडूंनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

वाचा सविस्तर - मानव जातीच्या पापांचा घडा भरतोय; गर्भवती हत्तीणीच्या हत्येवर खेळाडू भडकले

मुंबई - कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शहरात चित्रपट, टीव्ही कार्यक्रम इत्यादीच्या शूटिंगला परवानगी दिल्यानंतर चित्रपट निर्माते संजय गुप्ता म्हणाले की, रामोजी फिल्म सिटीमध्ये आपला आगामी मल्टीस्टारर 'मुंबई सागा' पूर्ण करणार असून यासाठी तो हैदराबादला जात आहे.

वाचा सविस्तर - रामोजी फिल्म सिटीत पार पडणार 'मुंबई सागा'चे उर्वरित शूटिंग, संजय गुप्ताने दिली माहिती

बीड- मी कोरोनाच्या भीतीमुळे आत्महत्या करत आहे. यामध्ये कोणाचाही दोष नाही,अशी चिठ्ठी लिहून एका 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीने स्वतःचे जीवन संपवले आहे. चिठ्ठीमधील मजकुरामुळे आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले आहे.पाटोदा तालुक्यातील मंगेवाडी येथे गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

वाचा सविस्तर - कोरोनाच्या भीतीने पाटोदा तालुक्यातील 65 वर्षीय वृद्धाची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.