ETV Bharat / bharat

Top 10 @ 3 PM : दुपारी तीनच्या ठळक बातम्या! - तीनच्या बातम्या

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रांतील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Top ten news at three PM
Top 10 @ 3 PM : दुपारी तीनच्या ठळक बातम्या!
author img

By

Published : Jun 7, 2020, 3:12 PM IST

  • मुंबई - लॉकडाऊन काळात राज्यात कोरोनाग्रस्त पोलिसांच्या संख्येत दर दिवशी भर पडत असून राज्य पोलीस दलात कोरोनाच्या संसर्गामुळे 33 पोलिसांचा आतापर्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात अजूनही कोरोनाबधित 1 हजार 497 पोलिसांवर उपचार सुरू आहेत. यात 196 पोलीस अधिकारी तर 1 हजार 301 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सविस्तर वाचा - राज्यात 33 पोलिसांचा कोरोनाने मृत्यू, 1 हजार 497 जणांवर उपचार सुरू

  • पुणे - सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ दारू पित बसलेल्या टोळक्याला हटकल्याने झालेल्या वादातून कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी किरकोळ जखमी झाल्या आहेत. शनिवारी (दि. 6 जून) सायंकाळी हा प्रकार कोथरूड परिसरात घडला. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वाचा - दारुड्यांच्या धक्काबुक्कीत माजी आमदार मेधा कुलकर्णी किरकोळ जखमी, दोघे अटकेत

  • मुंबई - ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत येत्या सोमवारपासून (8 जून) मुंबईच्या बेस्ट बसमध्ये आता सामान्य नागरिकांनाही प्रवासाची मुभा असणार आहे. बेस्ट प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने व मुंबई महापालिकेने जारी केलेल्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

सविस्तर वाचा - मुंबईकरांना दिलासा.. सोमवारपासून बेस्टच्या बसमधून सामान्य लोकांना करता येणार प्रवास

  • औरंगाबाद - केरळ येथील गर्भवती हत्तीच्या घटनेनंतर कुत्र्याला दोरीने बांधून दुचाकीने फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत समोर आला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानुसार दोघांंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा - VIDEO : औरंगाबादेत भूतदयेला तिलांजली, दुचाकीला कुत्रा बांधून नेले फरफटत

  • पाटणा - बिहारमध्ये राजकीय संघर्ष सुरू असून विरोधकांमध्ये पोस्टर-वॉर सुरू आहे. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात शहरात पोस्टर्स लागली आहेत. शहरात लागेल्या पोस्टर्सवर 'कैदी बजा रहा थाली, जनता बजाओ ताली' असे लिहिले आहे.

सविस्तर वाचा - 'कैदी बजा रहा थाली, जनता बजाओ ताली'; बिहारमध्ये पोस्टरवॉर

  • नवी दिल्ली - मणिपूरमधील कांगपोकली जिल्ह्यामध्ये एका गर्भवती महिलेने क्वारंटाईन सेंटरमध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये जन्म झाल्यामुळे बाळाचे नाव इमॅन्युअल क्वारंटीनो असे ठेवले आहे.

सविस्तर वाचा - क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेने दिला बाळाला जन्म...

  • आबू रोड - राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये तीन आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर काँग्रेस पक्ष सावध झाला आहे. पडझड टाळण्यासाठी त्यांनी पक्षातील इतर आमदारांशी संपर्क साधून त्यांना गुजरातमधील विविध हॉटेल, खासगी बंगल्यांमध्ये ठेवले होते. मात्र, आता अधिक खबरदारी म्हणून काही आमदारांना राजस्थानातील आबू रोड येथील वाईल्डविंड्स रिसॉर्टमध्ये नेण्यात आले आहे. शनिवारी हे आमदार या ठिकाणी पोहोचल्याची माहिती मिळाली आहे.

सविस्तर वाचा - राज्यसभा निवडणूक : गुजरातमधील काँग्रेस आमदार राजस्थानातील वाईल्डविंड्स रिसॉर्टमध्ये

  • श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाच्या जवानांची मोहीम घातली घेतली आहे. आज सकाळपासून (रविवार) दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्ह्याच्या रेबेन परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक सुरू आहे. यात जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केल्याची माहिती मिळत आहे.

सविस्तर वाचा - J-K: शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक, एका दहशतवाद्याला कंठस्नान?

  • वॉशिंग्टन डी. सी - कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरामध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरामध्ये आतापर्यंत 69 लाख 67 हजार 37 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

सविस्तर वाचा - Global Covid 19 Tracker: जगभरात 69 लाख 67 हजार 37 कोरोनाबाधित रुग्ण

  • मुंबई - आयसीसीने वर्णद्वेषाविरोधी सुरू केलेल्या मोहिमेला, भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने पाठिंबा दर्शवला आहे. त्याने आयसीसीच्या ट्विटला रिशेअर करताना दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांचे क्रीडाक्षेत्रावरील प्रसिद्ध विधान पोस्ट केले आहे.

सविस्तर वाचा - 'आयसीसी'च्या वर्णद्वेषविरोधी मोहिमेला सचिनचा पाठिंबा, म्हणाला...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.