- नवी दिल्ली - कोरोना महामारी आणि टाळेबंदी अशा दुहेरी संकटात अर्थव्यवस्था सापडली आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आठ क्षेत्रात महत्त्वाच्या आर्थिक सुधारणा जाहीर केल्या आहेत. यामध्ये संरक्षण क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के करणे, अंतराळ क्षेत्र खासगी कंपन्यांना खुले करणे, कोळसा क्षेत्रात खासगी कंपन्यांना परवानगी आदी महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.
सविस्तर वाचा - आठ क्षेत्रातील सुधारणांची घोषणा; संरक्षण क्षेत्रातील एफडीआयला ४४ टक्क्यांवरून ७४ टक्के परवानगी
- नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय हवाई क्षेत्राच्या वापरातील निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली आहे. त्यामधून नागरी विमान वाहतूक क्षेत्राला १ हजार कोटींचा लाभ होईल, असेही त्यांनी सांगितले.
सविस्तर वाचा - भारतीय हवाई क्षेत्राच्या वापरातील निर्बंध शिथिल - केंद्रीय अर्थमंत्री
- नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खनिजांच्या उत्खननासाठी प्रोत्साहन देणाऱ्या घोषणा केल्या आहेत. ५०० खनिजांच्या साठ्यांचे उत्खनन करण्यासाठी लिलाव घेण्यात येणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. या निर्णयाने केंद्र सरकारची खनिज क्षेत्रातील वर्चस्व संपुष्टात येणार आहे.
सविस्तर वाचा - आर्थिक पॅकेज: खनिज उत्खननाला प्रोत्साहन; ३०० खाणींचा करण्यात येणार लिलाव
- रायगड - पुण्यावरुन मुंबईकडे जाणारा तेलाच्या टँकरचा ब्रेक फेल झाल्याने पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोन ट्रक आणि एका पीकअप व्हॅनला टँकरची धडक बसल्याने दोन जण ठार तर तीनजण जखमी झाले आहेत. खोपोली शिळफाटा येथील पटेलनगर येथे हा अपघात झाला आहे.
सविस्तर वाचा - ब्रेक फेल होऊन तेलाचे टँकर पलटी; अपघातात दोन जण ठार, तीन जखमी
- पुणे - शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. मागील पंधरा दिवसांपूर्वी शहरात आढळणार्या रुग्णांची संख्या लक्षात घेता ती मे अखेरपर्यंत ९ हजाराहून अधिक होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती.
सविस्तर वाचा - ''पुण्यात मे अखेरपर्यंत पाच हजार कोरोनाबाधित रुग्ण असतील''
- वाशिम - कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र टाळेबंदी करण्यात आल्याने, रोजगाराच्या शोधात महानगरात गेलेला ग्रामीण भागातील मजूर वर्ग आपापल्या गावी परतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
सविस्तर वाचा - अभिमानास्पद; गावी येऊन विलगीकरणात असलेल्या कष्टकऱ्यांनी केली शाळेची साफसफाई
- वाशिम - जिल्हा सामान्य रुग्णालयातील गलथान कारभार पुन्हा एकदा उघडा पडला आहे. जाऊळका रेल्वे येथील एका महिलेच्या प्रसूतीदरम्यान डॉक्टरांच्या बेजबाबदार आणि हलगर्जीपणामुळे महिलेच्या नैसर्गिक विधीच्या दोन्ही जागा एकत्र झाल्या. महिलेला समस्या सुरू झाल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सविस्तर वाचा - भोंगळ कारभार: नर्सने घातला चुकीचा 'टाका', बाळंतिणीवर आला प्रसंग 'बाका'
- मुंबई - महाराष्ट्र हे फक्त मोठे राज्य नाही तर अद्वितीय राज्य असून देशाच्या आर्थिक विकासाचे केंद्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राला केंद्राकडून मदत आणि पाठिंबा मिळालाच पाहिजे, या राहुल गांधी यांच्या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. केंद्र सरकारने तत्काळ महाराष्ट्राला आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
सविस्तर वाचा - केंद्राकडून महाराष्ट्राला मदत मिळालीच पाहिजे, राहुल गांधींच्या मागणीला प्रदेश काँग्रेसचा पाठिंबा
- बीड - जमिनीच्या वादातून घडलेल्या तिहेरी हत्याकांडातील पीडित पवार कुटुंबीयांची आज पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जावे, यासाठी आपण प्रयत्न करणार असून विशेष सरकारी वकिलाची नेमणूक केली जाईल, असे मुंडे म्हणाले.
सविस्तर वाचा - तिहेरी हत्याकांड प्रकरण; पीडितांच्या भेटीला 'पालकमंत्री' आले धाऊन, दिली. . .
- नाशिक - कोरोना विरुद्धच्या लढाईत डॉक्टर आणि पोलीस हे महत्त्वपूर्ण काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मोठी आहे. यातच पोलीस तर २४ तास रस्त्यावर उतरून काम करत आहेत. त्यांच्याविषयी सामाजिक बांधिलकी जपत नाशिक पोलिसांसाठी अभिनेता अक्षय कुमार आणि 'दातार कॅन्सर जेनेटिक्स' यांच्याकडून अत्याधुनिक मनगटी घड्याळ देण्यात आली आहेत.
सविस्तर वाचा - अक्षय कुमारकडून नाशिक पोलिसांना ५०० अत्याधुनिक घड्याळ