भोपाळ - महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात मजूरांना रेल्वेने चिरडल्याची घटना ताजी असतानाच महाराष्ट्रातून उत्तरप्रदेशला जाणाऱ्या मजूरांच्या ट्रकला मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्यात भीषण अपघात झाला. ट्रक आणि बसची जोरदार धडक झाल्याने ८ मजूरांचा मृत्यू झाला तर ५५ जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री २ च्या सुमारास ही घटना घडली.
सविस्तर वाचा - महाराष्ट्रातून उत्तरप्रदेशला जाणाऱ्या मजूरांच्या ट्रकला अपघात, ८ जणांचा मृत्यू ५५ गंभीर
लखनौ - उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर- सहारनपूर महामार्गावरुन बिहारला पायी घरी जाणाऱ्या मजूरांना वेगवान बसने चिरडल्याची घटना घडली. या घटनेत ६ मजूरांचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवार रात्री उशिरा अपघात घडल्याचे पोलीसांनी सांगितले.
सविस्तर वाचा - उत्तरप्रदेश: बिहारला पायी जाणाऱ्या मजूरांना बसने चिरडले, ६ जणांचा मृत्यू, ४ जखमी
नाशिक - जिल्ह्याच्या पेठ तालुक्यातील अंबापूर येथे राहत असलेल्या तीन शाळकरी मुलींचा खंबाळे शिवारातील पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. यामध्ये दोन सख्ख्या बहिणींचा समावेश होता. निशा पंढरीनाथ किलिबले (वय 9, रा. उभीधोंड), योगिता पंढरीनाथ किलिबले (वय 12, रा. उभीधोंड) व पूनम संतोष बोके (वय 13, रा. अंबापूर) अशी मृत्यू झालेल्या तिघींची नावे आहेत.
सविस्तर वाचा - पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा तलावात बुडून मृत्यू, दोन सख्ख्या बहिणींचा समावेश
रायगड - कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या महाड ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या चारवर पोहोचली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर वाचा - महाड ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकेला कोरोनाची लागण
मुंबई- छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राला शौर्य, स्वराज्य बाणा, पुरोगामी विचार दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी सलग नऊ वर्षे संघर्ष केला. स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान दिले. त्यांचा संघर्षमय इतिहास आपल्यासाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.
सविस्तर वाचा - छत्रपती संभाजी महाराजांच्या संघर्षाचा इतिहास महाराष्ट्राला प्रेरणा देत राहील - अजित पवार
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज(गुरुवार) ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. काल झालेल्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी ३ लाख कोटींची कर्ज योजना जाहीर करण्यात आली. त्यासह बांधकाम, भविष्य निर्वाह निधी, नागरिकांच्या आणि उद्योगांच्या हातात आणखी पैसा यावा म्हणून विविध घोषणा केल्या.
सविस्तर वाचा - निर्मला सितारामन यांची आज 4 वाजता पत्रकार परिषद; कोणाला दिलासा मिळणार याकडे लक्ष
नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना संकटाने थैमान घातले असून भारतामध्ये रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आल्याने मजूर, कामगारांसाठी श्रमिक रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या. मात्र, प्रवासी वाहतूक अद्याप सुरु केलेली नाही. रेल्वे विभागाने पुन्हा एकदा आरक्षित तिकिटे रद्द करण्याचा निर्णय घेतला असून ३० जूनपर्यंतची सर्व प्रवासी तिकिटे रद्द केली आहेत.
सविस्तर वाचा - रेल्वे प्रवास नाहीच! 30 जून पर्यंतचे सर्व प्रवासी तिकीट बुकिंग रद्द
नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा उद्रेक हा चीनच्या वुहानमधून झाला आहे. यामुळे लाखो लोकांच्या आयुष्यावर प्रभाव पडला. हा विषाणू नैसर्गिक नसून प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेले विषाणू असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
सविस्तर वाचा - 'कोरोना विषाणू हा नैसर्गिक नसून प्रयोगशाळेत तयार झाला'
हैदराबाद - देशभरात मागील २४ तासांत कोरोनाचे नवे ३ हजार ७२२ रुग्ण आढळून आले आहेत. तर १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७८ हजार ०३ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्ययावत आकडेवारी जाहीर केली आहे.
सविस्तर वाचा - COVID-19: मागील २४ तासांत देशात ३ हजार ७२२ रुग्ण; एकूण बाधित ७८ हजार
जिनिव्हा - सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे जगभरातील संपूर्ण जनजीवन विसकळीत झाले आहे. कोरोना विषाणूवर अटकाव आणण्यासाठी जगभारात प्रयत्न सुरु आहेत. कदाचित कोरोना विषाणू कधीच पूर्णपणे जाणार नाही, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे आपल्याला त्यासोबतच जगण्याची कला आत्मसात करायला हवी, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
सविस्तर वाचा - 'कदाचित कोरोना विषाणू कधीच पूर्णपणे जाणार नाही'