- हैदराबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषीत केलेल्या आत्मनिर्भर भारत पॅकेजची आणि त्यातील २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे विवरण अर्थमंत्री निर्मला सीतारामन करत आहेत. आज त्यांनी त्याचा चौथा टप्पा जाहीर केला. यामध्ये कोळसा, एअरस्पेस व्यवस्थापन,विमानतळ,प्रादेशक विभागात उर्जा वितरण कंपन्या,अंतराळ,आण्विक उर्जा,खाणकाम या क्षेत्राबद्दलच्या काही महत्त्वाच्या घोषणा त्यांनी केल्या. या संदर्भातील विश्लेषण आणि काय आहेत या घोषणा, सोप्या भाषेत सांगत आहेत 'ईटीव्ही भारत'चे वृत्तसंपादक राजेंद्र साठे.
सविस्तर वाचा - 'आत्मनिर्भर भारत' पॅकेज : चौथ्या टप्प्याचे अत्यंत सोप्या भाषेत विश्लेषण...
- सोलापूर - कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन अनेकांची वाताहत होत आहे. त्याच प्रमाणे सुखी संसाराची स्वप्न उराशी घेऊन पुण्यात कामासाठी गेलेल्या एका जोडप्याच्या नशिबीही बाका प्रसंग आला. नऊ महिन्याची गर्भवती असलेल्या एका महिलेस पोटात एक जीव घेऊन पुणे ते सोलापूर असा खडतर पायी प्रवास करावा लागला.
सविस्तर वाचा - सुरक्षित प्रसूतीसाठी गर्भवतीची २५० किमी पायपीट... छायाचित्रकाराने केली मदत
- ठाणे - नोटाबंदीनंतर पुन्हा एकदा नियोजन न करताच पंतप्रधान मोदींनी लॉकडाउनचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याची टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केंद्र सरकारवर केली आहे. मेधा पाटकर ह्या पायपीट करत गावी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांची व्यथा जाणून घेण्यासाठी भिवंडीत आल्या होत्या.
सविस्तर वाचा - पंतप्रधान मोदींनी नियोजन न करताच लॉकडाउनचा घेतलेला निर्णय चुकीचा - मेधा पाटकर
- परभणी - केंद्र शासनाने अचानक घेतलेल्या पीओपी अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदीमुळे मूर्तिकारांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. महाराष्ट्रातील गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणात लागणाऱ्या मूर्ती बनवणाऱ्या व्यवसायिकांची 80 टक्के तयारी झाली आहे.
सविस्तर वाचा - 'पीओपी'वरील बंदीमुळे मूर्तिकारांचा व्यवसाय धोक्यात; परभणीच्या व्यवसायिकांवर कर्जबाजारीची वेळ
- नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खनिजांच्या उत्खननासाठी प्रोत्साहन देणाऱ्या घोषणा केल्या आहेत. ५०० खनिजांच्या साठ्यांचे उत्खनन करण्यासाठी लिलाव घेण्यात येणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. या निर्णयाने केंद्र सरकारची खनिज क्षेत्रातील वर्चस्व संपुष्टात येणार आहे.
सविस्तर वाचा - आर्थिक पॅकेज: खनिज उत्खननाला प्रोत्साहन; ५०० खाणींचा करण्यात येणार लिलाव
- हैदराबाद - बिगर वैद्यकीय मास्कच्या निर्यातीला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे लोकर, कापूस व रेशीमपासून तयार करण्यात आलेले मास्क निर्यात करणे शक्य होणार आहे.
सविस्तर वाचा - बिगर वैद्यकीय मास्कच्या निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी
- नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खासगी कंपन्यांना कोळशांच्या खाणीच्या उत्खननासाठी परवानगी देणार असल्याचे जाहीर केले. हे कोळशाच्या खाणीचे व्यवसायिकीकरण महसुलाच्या वाट्यावर आधारित असल्याची माहिती सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सविस्तर वाचा - 'कोळशाच्या खाणींचे व्यवसायिकीकरण महसुलाच्या वाट्यावर आधारित'
- नवी दिल्ली - देशातील संरक्षण उत्पादनात मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्याकरता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सुधारणा जाहीर केल्या आहेत. संरक्षण उत्पादनात थेट विदेशी गुंतवणूक ही ४९ टक्क्यांवरून ७४ करण्याला परवानगी देण्यात आली आहे.
सविस्तर वाचा - संरक्षण क्षेत्रात 'मेक इन इंडिया'; आयुध निर्माण कारखाने शेअर बाजारात होणार सूचिबद्ध
- हैदराबाद - जगाने आरोग्य क्षेत्रात केलेल्या प्रगतीला शह देवून कोरोना विषाणूने जगाला गुडघे टेकायला भाग पाडले आहे. “कोविड-१९ या साथीच्या रोगाने अवघ्या जगाचे जनजीवन विस्कळीत केले आहे. त्याचबरोबर अनेकांच्या रोजीरोटीला आणि अलिकडच्या काळात आरोग्य क्षेत्रात जगाने केलेल्या प्रगतीला धोका निर्माण केला आहे,” असे २०२०च्या वर्ल्ड हेल्थ स्टॅटिस्टिक्समध्ये म्हटले आहे.
सविस्तर वाचा - लोकांचे आयुर्मान वाढले परंतु कोविड-१९चा धोका तसाच : डब्ल्यूएचओ रिपोर्ट
- मुंबई - बॉलिवूडचा शहंशाह अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसोबत ते नेहमी आपली खासगी आयुष्य असो, की व्यावसायिक गोष्टी ते शेअर करीत असतात.
सविस्तर वाचा - अमिताभ बच्चन यांचा चाहत्यांना घरीच जिम करण्याचा सल्ला