ETV Bharat / bharat

ईटीव्ही भारत विशेष : गुन्हेगारीतील अनेक 'बाहुबली' बिहार निवडणुकीच्या मैदानात..!

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे अनेक लोक रिंगणात उतरले आहेत. काही पक्षांनी कंलकित, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना उमेदवारी देताना जराही विचार केल्याचे दिसत नाही. काही ठिकाणी अशा उमेदवारांना तिकीट देणे अडचणीचे ठरू शकत असल्याने त्यांच्या कुटुंबात अथवा नातेवाईकांना उमेदवारी दिली आहे.

author img

By

Published : Oct 11, 2020, 10:43 PM IST

ईटीव्ही भारत विशेष
ईटीव्ही भारत विशेष
अनंत सिंह
अनंत सिंह

अनंत सिंह - विवादित वक्तव्ये आणि वादग्रस्त प्रतिमेसाठी परिचित आहेत. यावेळी राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) तिकिटावर निवडणूक लढवित आहेत. सिंह यांच्यावर जमीन खटले, अवैध ताबा आणि खून यासारख्या गंभीर बाबींविषयी खटले सुरू आहेत. ते सध्या तुरूंगात आहेत. त्यांच्यावर दोन डझनहून अधिक खटके सुरू आहेत. अनंतसिंह यापूर्वी 'मोकामा'चे आमदारही राहिले आहेत.

रामा किशोर सिंह
रामा किशोर सिंह

रामा किशोर सिंह - ९० च्या दशकापासून अपहरण, धमकावणे, खंडणी यासारख्या गुन्ह्यांमधील आरोपी म्हणून रामा किशोर सिंह यांचे नाव आघाडीवर आहे. बिहारच्या राजकारणातील एक कुप्रसिद्ध चेहरा. हाजीपूरला लागून असलेल्या वैशालीच्या महानार भागात दबंग प्रतिमेचे नेते रामा सिंह यांचा नुकताच (राष्ट्रीय जनता दल) आरजेडीत येण्यावरून वाद झाला. राजदचे बलवान नेते रघुवंश प्रसाद यांनी याला विरोध केला होता. आरजेडीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर रामा सिंह यांची पत्नी वीणा देवी यांना मनहारमधून उमेदवारी दिली आहे.

आनंद मोहन
आनंद मोहन

आनंद मोहन - डीएम कृष्णैय्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारे आनंद मोहन हे बिहारच्या राजकारणातील सर्वात चर्चित नाव आहे. एकेकाळी राजकारणातील अनेक बड्या नेत्यांचे आश्रयदाता असलेले आनंद मोहन आजही चर्चेत आहेत. आधी त्यांची पत्नी जेडीयूमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण शेवटी ते आरजेडीमध्ये दाखल झाले. आनंद मोहन यांची पत्नी लवली आनंद आरजेडीच्या तिकिटावर सुपौल येथून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

अजय सिंह
अजय सिंह

अजय सिंह - सीवानच्या दरौंदा मतदारसंघातून अजय सिंह यावेळी निवडणूक लढवणार आहेत. अजय सिंह यांनी यापूर्वी जेडीयूच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवली होती. त्यांनी आपल्या पत्नीसाठी जेडीयूकडून तिकीट मागितले होते. गुन्हेगारी प्रतिमेमुळे जेडीयूने तिकीट दिले नाही. त्यामुळे यंदा ते स्वत: अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

अरुण यादव
अरुण यादव

अरुण यादव - अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून चर्चेत आलेल्या आरजेडीचे आमदार अरुण यादव यांची पत्नी किरण देवी आरजेडीच्या तिकिटावर निवडणूक लढविणार आहेत. अरुण यादव हे भोजपूर जिल्ह्यातून आमदार आहेत.

अमरेंद्र पांडे
अमरेंद्र पांडे

अमरेंद्र पांडे - अमरेंद्र पांडे ऊर्फ पप्पू पांडे (जेडीयूचे आमदार होते) यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. त्यांच्यावर गोपाळगंज तिहेरी हत्या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपाळगंजच्या कुचायकोटचे आमदार अमरेंद्र पांडे यांच्यावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यावेळीही ते जेडीयूच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत.

रीतलाल यादव
रीतलाल यादव

रीतलाल यादव - पटनापासून संपूर्ण बिहारमध्ये गुन्हेगारीच्या आरोपांसाठी ओळखले जाणारे रितलाल यादव यावेळी विधानसभा निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहेत. रितलाल हे खंडणी वसुली, रेल्वेमध्ये जबरदस्तीने पैसै उकळणे अशा अनेक प्रकरणांमध्ये ओळखले जातात. आरजेडीच्या जागेवर दानापूर प्रदेशातून निवडणूक लढवल्याची चर्चा आहे. कोणत्याही पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतात.

राजाबल्लभ यादव
राजाबल्लभ यादव

राजाबल्लभ यादव - आरजेडीचे राजाबल्लभ यादव (नवादाचे आमदार होते) देखील खूप चर्चेत आहेत. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्यासह अन्य पाच आरोपींनाही दोषी ठरविण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी विभा देवी नवादा येथून निवडणूक लढवणार आहेत. आरजेडीच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू आहे.

अवधेश मंडल
अवधेश मंडल

अवधेश मंडल - बिमा भारती यांचे पती अवधेश मंडल यांचा गुन्हेगारीचा मोठा इतिहास आहे. नुकतीच त्यांनी आरजेडीच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. त्यांची पत्नी नितीश सरकारमध्ये मंत्री आहेत, पण जेडीयूने त्यांचा फक्त वापर केल्याचा आरोप अवधेश मंडल यांनी केला आहे. निवडणुका लढवण्याची परवानगी दिलेली नाही.

हुलास पांडे
हुलास पांडे

हुलास पांडे - शहाबाद प्रांताचे नेते हुलास पांडे हे विधान परिषदचे आमदार राहिले आहेत. एन.आय.एच्या पथकाने एके-47 रायफली खरेदी प्रकरणावरून त्यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यांच्यावर बरेच आरोप आहेत. एलजेपीचे नेते हुलास पांडे यावेळेस लोजपाच्या तिकिटावर ब्रह्मपूरमधून निवडणूक लढवत आहेत.

सुनील पांडे
सुनील पांडे

सुनील पांडे - अनेक वेळा आमदार झालेले सुनील पांडे यांचा राजकारणाशी जुना संबंध आहे. एनआयएने त्यांची एके-४७ च्या खरेदीप्रकरणी चौकशी केली आहे. एक सुशिक्षित नेता असूनही त्यांचे नाव गुन्हेगारीच्या दुनियेत चर्चित आहे. नुकताच त्याने एलजेपी सोडली. यावेळी ते अपक्ष निवडणूक लढवतील.

मंजू वर्मा
मंजू वर्मा

मंजू वर्मा - मुजफ्फरपूर शेल्टर होम घोटाळ्यात माजी मंत्री मंजू वर्मा यांचे पती चंद्रशेखर वर्मा यांचे नाव चर्चेत होते. चंद्रशेखर वर्मा यांच्याविरूद्ध अवैध शस्त्रे ठेवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तथापि मंजू वर्मा स्वातंत्र्यसैनिकांची मुलगी आहे. त्यांचे सासरे सुखदेव महतोदेखील माकपचे आमदार राहिले आहेत. यावेळी त्या निवडणूकही लढवत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.