ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या..

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top 10
top 10
author img

By

Published : Sep 1, 2020, 3:16 PM IST

Updated : Sep 1, 2020, 10:43 PM IST

  • नवी दिल्ली - देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचा विकास दर हा उणे २३.९ टक्के झाल्याचे ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. देश गंभीर आर्थिक संकटात सापडल्यानंतर विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदी तसेच भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या वक्तव्यांची आठवण करून देत चिमटा काढला आहे.

सविस्तर वाचा - 'आता पकोडे तळायची वेळ आलीय'....आर्थिक मंदीवरून कपिल सिब्बल मोदींवर बरसले

  • जळगाव - गणपती विसर्जनासाठी गेलेले तीन तरूण गुळ नदीच्या पाण्यात बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील विरवाडे येथे घडली आहे.

सविस्तर वाचा - गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांसह तिघांचा नदीत बुडून मृत्यू

  • नांदेड - डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज (वय १०४) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती होते. आज दुपारी एकच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

सविस्तर वाचा - शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे नांदेड येथे निधन; पार्थिव अहमदपूरकडे रवाना

  • नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी निधन झाले होते. त्यांच्यावर मंगळवारी लोधी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

सविस्तर वाचा- माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अनंतात विलीन..

  • मुंबई - गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आज अनंत चतुर्थीच्या दिवशी सांगता होत आहे. आज दहा दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होणार असून यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. विसर्जनासाठी ४४५ स्थळं निश्चित करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण शहरात ३५ हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सविस्तर वाचा- गणपती बाप्पाला आज निरोप! मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त

  • पुणे - मानाचा पहिला गणपती कसबा गणेशाचे साधेपणाने विसर्जन करण्यात आले. सकाळी 11 वाजून 44 मिनिटांनी गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. दरवर्षी, मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला हार घालून कसबाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. मात्र, यंदा कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला असून बाप्पाचे विसर्जनही साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे कसबा गणपतीच्या मंदिरात बांधण्यात आलेल्या कृत्रिम हौदामध्येच गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

सविस्तर वाचा- पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे पार पडले विसर्जन

  • मुंबई - मागील 10 दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पूजाकेल्यावर अनंतचतुर्थीला गणेशाला निरोप देण्यात येतोय. राज्यभरात सर्वत्र कोरोनाच्या नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा होतोय. महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र खरबदारी घेण्यात येत आहे. मुंबईतील गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात मंडळं, मिरवणुकांसाठी गर्दी हे चित्र अनंतचतुर्दशीला पाहायला मिळते. मात्र यावेळी सर्वत्र शांततेत विसर्जन पार पडत आहे.

सविस्तर वाचा- जुहू समुद्रकिनारी विसर्जनाकडे पाठ...यंदा कृत्रिम तलावांकडे भाविकांचा कल

  • कराड (सातारा) - कोयनानगर परिसर मंगळवारी सकाळी भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. या भुकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.6 एवढी नोंदली गेली आहे. भूकंपामुळे धरणाला कसलाही धोका पोहचलेला नाही.

सविस्तर वाचा- कोयनानगरला भूकंपाचा सौम्य धक्का; धरण सुरक्षित

  • परभणी - जिल्हा कारागृहात 84 बंदिवान पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्यापैकी 16 बंदिवानांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, यातील खून आणि गांजा तस्करी प्रकरणातील 3 बंदिवान मंगळवारी पहाटेच्या सुमारास खिडकीचे गज तोडून फरार झाले. त्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा- धक्कादायक; परभणीच्या जिल्हा रुग्णालयातून तीन कोरोनाबाधित बंदिवान फरार

  • नागपूर - तमाम काँग्रेसजनांच्या नाराजीची तमा न बाळगता माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ७ जून २०१८ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्ग समारोपीय कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी भाषणही दिले. संघाच्या व्यासपीठावर देण्यात आलेले हे भाषण चांगलेच गाजले. कारण यामध्ये त्यांनी विविधतेत एकता, राष्ट्रीयत्व, भारतीयत्व या विषयांवर विचारमंथन केले; आणि संघाला थेट या संज्ञांच्या व्याख्या सांगितल्या. त्यानंतर हे भाषण चांगलेच चर्चेचा विषय ठरले.

सविस्तर वाचा- ...जेव्हा प्रणव मुखर्जींनी आरएसएसच्याच व्यासपीठावर जाऊन दिलं होतं राष्ट्रीयत्वाचं बौद्धीक

Last Updated : Sep 1, 2020, 10:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.