ETV Bharat / bharat

Top 10 @ 7 PM : सायंकाळी सातच्या ठळक बातम्या!

author img

By

Published : Oct 19, 2020, 7:00 AM IST

Updated : Oct 19, 2020, 7:09 PM IST

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

सायंकाळी सातच्या ठळक बातम्या
Top 10 @ 7 PM
  • उस्मानाबाद - अतिृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी 'मी पुन्हा येईन' असे शरद पवार म्हणाले आहेत. मागील दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

सविस्तर वाचा- ...म्हणून शरद पवार म्हणाले, मी पुन्हा येईन!

  • मुंबई - कुठल्याही शेतकर्‍यांना अडचणीच्या काळात अडचणीत राहू देणार नाही. शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकार घेणार असून कॅबिनेटच्या बैठकीत सरकार निश्चितरुपाने मदत जाहीर करेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

सविस्तर वाचा- 'शेतकऱ्यांच्या मदतीचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत'

  • मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज (सोमवारी) मुंबईतील डबेवाल्यांना राजभवन येथे सायकल वाटप करण्यात आले. यावेळी १२ डबेवाल्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सायकलच्या चाव्या देण्यात आल्या. परोपकार करण्याची क्षमता ईश्वराने केवळ मनुष्याला दिली आहे, त्याचा माणसाने सदुपयोग केला पाहिजे. आपल्या देशात गरिबात गरीब व्यक्तिमध्ये आपल्या ताटातील अर्धे जेवण दुसऱ्या गरजूला देण्याची भावना आहे. अशा परोपकारी लोकांमुळेच समाज जिवंत राहतो, असे कोश्यारी यांनी सांगितले.
    सविस्तर वाचा- राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते डबेवाल्यांना सायकल वाटप
  • बुलडाणा- नेटवर्क ऑफ बुलडाणा या संस्थेने जिल्ह्यात ५० एचआयव्ही संसर्गित रुग्णांचे संसार थाटले आहे. यात २० आंतरजातीय विवाह, २० विधवांचे पुनर्वसन, तर एकाच समाजतील १० युवक-युवतींचे संसार थाटण्यात आले आहे.

सविस्तर वाचा- ५० एचआयव्हीग्रस्त जोडप्यांनी थाटले संसार, नेटवर्क ऑफ बुलडाणाचा उपक्रम

  • सोलापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अक्कलकोट तालुक्याच्या पाहणी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यावेळी केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ठाकरे यांनी केंद्राकडून मदत घेण्यात गैर काय? असा सवाल विरोधकांना केला आहे.

सविस्तर वाचा- केंद्राकडून मदत घेणे त्यामध्ये गैर काय? ती तर त्यांची जबाबदारीच - ठाकरे

  • मुंबई- ठाण्यातून मुंबई मधील भांडुप येथे खासगी कामासाठी जाणाऱ्या व्यक्तीची बॅग रिक्षात राहिली होती. रिक्षा चालकाला शोधून व्यक्तीला बॅग मिळवून देण्याचे काम भांडुप पोलिसांच्या पथकाने केले आहे. भांडुप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र अहीर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

सविस्तर वाचा- कौतुकास्पद..! भांडुप पोलिसांनी प्रवाशाला परत केली पैशांनी भरलेली बॅग

  • पाटणा - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह बिहारमध्ये प्रचार करणार आहे. यापार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सविस्तर वाचा- बिहार विधानसभा निवडणूक : मोदी-शाहसह अनेक नेत्यांच्या प्रचार सभेत दहशतवादी हल्ल्याची भीती

  • नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या हाथरस बलात्कार प्रकरणावरून देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयला सोपवला असून आरोपींची चौकशी करण्यासाठी सीबीआयची टीम जिल्हा कारागृहात पोहचली. सीबीआयच्या दुसऱ्या टीमने जे.एन. वैद्यकीय रुग्णालयात पीडितेवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांची चौकशी केली. हाथरस आरोपी सध्या अलीगढ कारागृहात आहेत.

सविस्तर वाचा- हाथरस प्रकरण : आरोपींच्या चौकशीसाठी सीबीआयची टीम अलीगढ कारागृहात

  • मुंबई - मिर्झापूरच्या दुसर्‍या सिझनसाठी लोकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अशावेळी अमेझॉन प्राइम व्हिडिओने मिर्झापूरचे कलाकार आणि उत्तर प्रदेशातील रहिवासी यांना जवळ आणण्याचा नवा मार्ग शोधलाय. बनारस, आग्रा, गाझियाबाद, बरेली, प्रयागराज, मेरठ, लखनऊ आणि कानपूर या शहरांच्या आसपास राहणाऱ्या लोकांना मिर्झापूरच्या सिंहसनावर कोणाला बसवायचे हे ठरवण्याची संधी मिळणार आहे.

सविस्तर वाचा- मिर्झापूर २ : मिर्झापूरच्या सिंहासनावर कोणाला बसवायचे हे ठरवणार युपीचे रहिवासी

  • दुबई - रविवारी मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात जबरदस्त सामना झाला. कदाचित हा आयपीएल इतिहासातील सर्वात रोमांचक आणि बेस्ट सामना होता. कारण या सामन्यात पहिल्यांदाच दोन सुपर ओव्हर पाहायला मिळाली. एका सामन्यात दोन सुपर ओव्हर होण्याची आयपीएलच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ. पंजाबने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली. दरम्यान, या सामन्यातील दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला नाही. याचे कारण आता समोर आले आहे.

सविस्तर वाचा- आजारी रोहित शर्माबद्दल केरॉन पोलार्डने दिले अपडेट

Last Updated : Oct 19, 2020, 7:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.