- मुंबई - संपूर्ण जगाला आणि देशाला वेठीला धरलेल्या कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाने आज राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांचा उच्चांक गाठत 16 हजार 867 नव्या रुग्णांची नोंद केली आहे. आत्तापर्यंतची एका दिवसातली सर्वोच्च वाढ असून राज्यात आज ११ हजार ५४१ रुग्ण बरे झाले तर १६ हजार ८६७ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५८ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ५४ हजार ७११ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ८५ हजार १३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर वाचा- महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक : आज सर्वाधिक 16 हजार 867 रुग्णांची नोंद, 328 मृत्यू
- नवी दिल्ली - काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज(शनिवार) मोदी सरकारवर टीका केली. देशविरोधी आणि गरीबविरोधी शक्ती देशात तिरस्कार आणि हिंसा पसरवत असून मोदी सरकारच्या काळात देशात लोकशाहीला डावलून हुकूमशाहीचा प्रभाव वाढत असल्याचा घणाघात त्यांनी भाजपवर केला.
सविस्तर वाचा-'देशविरोधी शक्ती हिंसा, तिरस्कार पसरवतायेत, लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय'
- रायगड- महाड शहरातील काजळपुरा परिसरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटना प्रकरणी आणखी एका आरोपीला महाड पोलिसांनी अटक केली आहे. युनूस शेख असे या आरोपीचे नाव आहे. त्याला माणगाव न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यत आरसीसी सल्लागार बाहुबली धमाणे आणि युनूस शेख या दोघांना अटक झाली आहे. यातील मुख्य आरोपी फारुक काझी हा फरार आहे. 3 जणांना ताब्यात घेणे बाकी आहे. युनूस शेख हा जखमी असल्याने त्याला अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.
सविस्तर वाचा- महाड इमारत दुर्घटना: बिल्डर फारूक काझीचा साथीदार युनूस शेखला अटक
- नवी दिल्ली - केंद्र सरकारने अनलॉक ४ ची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. नव्या नियमांनुसार आता मेट्रो सेवा ७ सप्टेंबपासून सुरू होणार आहे. मेट्रो सेवा देशभरात २२ मार्चपासून कोरोनाच्या प्रसारानंतर बंद ठेवण्यात आली होती. देशभरात अनलॉकचा हा चौथा टप्पा आहे. नवी मार्गदर्शक तत्वे केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली असून, ३० सप्टेंबरपर्यंत हे नियम लागू राहणार आहेत.
सविस्तर वाचा- अनलॉक 4 : अखेर पाच महिन्यानंतर मेट्रो धावणार; केंद्र सरकारकडून नवे नियम जारी
- नवी दिल्ली - मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय खेळ पुरस्कारांचे वितरण आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. पण, या पुरस्कार सोहळ्याआधी एक दु:खद बातमी समोर आली. पुरस्कारासाठी निवड झालेल्या अॅथलेटिक्स प्रशिक्षक पुरुषोत्तम राय यांचं निधन झाले आहे. राय यांना आज राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येणार होता.
सविस्तर वाचा- दुर्दैवी..! द्रोणाचार्य पुरस्कार स्वीकारण्याआधीच भारतीय प्रशिक्षकाचा मृत्यू
- नागपूर - जिल्ह्यात आज 81.43 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. नवेगाव खैरी आणि तोतलाडोह प्रकल्पाचे अनुक्रमे 16 व 14 दरवाजे उघडण्यात आले आहे. आजच्या आकडेवारीनुसार नवेगांव खैरी प्रकल्पातून सरासरी 6839 क्युसेक आणि तोतलाडोह प्रकल्पातून 6693 क्युसेक पाण्याची विसर्ग होत असून एकूण 25 गावांना पुराचा विळखा पडला आहे. त्यामुळे 2 हजार 907 कुटुंबांतील 11 हजार 64 व्यक्ती बाधित झाले आहेत.
सविस्तर वाचा- नागपूर पूर : नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याचे कार्य बचाव पथकामार्फत सुरू
नवी दिल्ली - कोविड -१९ साथीच्या आजारामुळे देशातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जुनी सर्कस असलेल्या रॅम्बो सर्कसवर परिणाम झाला आहे. आता ही समस्या सोडवून प्रथमच ते डिजिटल पद्धतीने आपला कार्यक्रम आयोजित करणार आहेत.
सविस्तर वाचा- डिजिटल शोसह मनोरंजनासाठी सज्ज झाली 'रॅम्बो सर्कस'!
- अकोला- पोकरा योजनेची जिल्ह्यात समाधानकारक काम झाले नाहीत. या कामांसाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांना कृषिमंत्री दादा भुसे यांनी काही अडचणी आहेत का, असा प्रश्न विचारला असता तर अधिकाऱ्यांकडून त्याबाबत ही योग्य उत्तर त्यांनी दिले नाही. त्यावर कृषी मंत्री यांनी अधिकाऱ्यांना अहो जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, अशा शब्दात कृषी अधिकाऱ्यांचा आज समाचार घेतला.
सविस्तर वाचा-'अहो जनाची नाही तर मनाची लाज बाळगा'
- नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील आपले राजकीय स्थान परत मिळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते जितीन प्रसाद यांनी उत्तर प्रदेशमधील जातीय राजकारणावर ज्येष्ठ पत्रकार अमित अग्निहोत्री यांना दिलेल्या मुलाखतीत प्रकाश टाकला आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त एकच जागा मिळाली होती. अमेठीमध्येही राहुल गांधींना पराभव पत्कारावा लागला होता. राज्यातील ब्राम्हणांवरही अत्याचार होत असून मी त्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न करत आहे की, त्यांच्या समस्या या दिल्ली किंवा लखनऊमध्ये ऐकल्या जातील, असे मुलाखतीमध्ये जितीन प्रसाद यांनी सांगितले.
सविस्तर वाचा-'उत्तर प्रदेशमधील ब्राम्हण समाजाला एकत्र आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न गैरराजकीय'
नवी दिल्ली - केंद्र सरकारने आज देशभरामध्ये अनलॉक ४ ची नियमावली जारी केली आहे. त्यानुसार आधी निर्बंध असलेल्या विविध गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्याचे नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत देशभरातील शाळा, महाविद्यालये बंदच राहणार आहेत. मात्र, यात एक बदल करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा- UNLOCK ४: विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी शाळेत जाता येणार; मात्र...