- लखनऊ - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांना काल(शुक्रवार) प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे. लखनऊमधील मेधांता रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती स्थिर
- नागपूर - कोझिकोड येथे झालेल्या विमान दुर्घटनेत माजी विंग कमांडर आणि एअर इंडियाचे पायलट दीपक साठे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे आई-वडिल हे नागपूरात राहत आहेत. आपला मुलगा देशाला समर्पित झाल्याचा मला सार्थ अभिमान आहे, अशी भावना दिपक साठे यांच्या आई निलाबाई साठे यांनी व्यक्त केली.
सविस्तर वाचा - मुलगा देशास समर्पित झाल्याचा सार्थ अभिमान; विंग कमांडर दीपक साठेंच्या आईची भावना
- नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कॉंग्रेसने जोरदार हल्ला चढवत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने चिनी कंपन्यांसोबत भागिदारी केल्याचा आरोप केला आहे. सत्ताधारी पक्षाने निवडणूक प्रचारासाठी युसी वेब ब्राऊजर, गामा लिमिटेड आणि शेअरइट टेक्नॉलॉजीसारख्या चिनी कंपन्यांना कामावर घेण्याबाबतही कॉंग्रेसने भाजपप्रणित केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
सविस्तर वाचा - 2019 लोकसभा निवडणूक : भाजपाच्या प्रचारात चिनी कंपन्यांची भागिदारी, काँग्रेसचा आरोप
- नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या काळात आघाडीवर काम करणाऱ्या कोरोना वॉरिअर्स ‘आशा’ आरोग्य कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. काम करताना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्या या मागणीसाठी संप पुकारण्यात आला आहे. या संपावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला फटकारले आहे.
सविस्तर वाचा - 'आशा' कर्मचाऱ्यांच्या संपावर राहुल गांधींनी केंद्र सरकारला फटकारले, म्हणाले....
- मुंबई - राज्य शासनाने एसटी महामंडळाला 550 कोटी रुपयांची आर्थिक मदत केल्याने अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा पगाराचा तिढा सुटला आहे. आज(शनिवार) एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात थकीत वेतन जमा झाले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सविस्तर वाचा - अखेर एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात थकीत वेतन जमा
- नागपूर - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची सुनावणी ११ तारखेला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पुढची कारवाई करू, असे अनिल देशमुख म्हणाले. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा मुंबई पोलीस अतिशय सक्षमपणे तपास करत असल्याचेही देशमुख म्हणाले.
सविस्तर वाचा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण: मुंबई पोलिसांचा अतिशय सक्षमपणे तपास सुरू - अनिल देशमुख
- पुणे - गणेशोत्सव पुण्याचे वैभव आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सवही साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन शासनाच्यावतीने करण्यात आले आहे. कोरोनावर आळा घालण्यासाठी सर्वच सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत गणेशोत्सवात सर्वांना घरच्या घरी 'बाप्पा'ची मूर्ती मिळावी, म्हणून येथील पाच राष्ट्रीय खेळाडू एकत्र आले आहेत.
सविस्तर वाचा - स्पेशल : पुण्याचं वैभव जपण्यासाठी राष्टीय खेळाडू झाले गणेश मूर्ती विक्रेते
- कोल्हापूर - कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. पण तेथील काही स्थानिक लोकांनी आणि तथाकथित प्रादेशिक अस्मिता मिरवणाऱ्या संघटनांनी या प्रतिष्ठापणेला विरोध केला होता. कर्नाटक प्रशासनानेसुद्धा त्यांचीच बाजू घेत रातोरात हा अश्वारूढ पुतळा हटवला.
सविस्तर वाचा - बेळगाव : शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रातोरात हटवला; गावात तणावाचे वातावरण
- मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी केली जात आहे. शुक्रवारी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती ही ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली होती. या चौकशी दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुशांतच्या कंपनीच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित रियाला माहिती विचारली.
सविस्तर वाचा - रिया म्हणाली, सुशांतच्या केवळ दोनच गोष्टी माझ्याकडे...
- वॉशिंग्टन डीसी: १९९० च्या दशकात अमेरिकेमध्ये फ्रेंड्स ही सिटकॉम मालिका प्रचंड लोकप्रिय होती. या मालिकेतील कलाकारांच्या रियुनियनचा शो होण्यास उशीर झाला आहे. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे हा शो पुढे ढकलण्यात आला होता.
सविस्तर वाचा - फ्रेंड्स स्पेशल रियुनियन शो पुन्हा लांबणीवर