मुंबई - जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत जवानानी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.... सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा धक्का पचवू न शकल्याने तामिळनाडूमधील कोईम्बतूर येथे त्याच्या चाहत्याने गळफास लावून आत्महत्या केली... अकरावी प्रवेशाच्या शासन निर्णयानुसार आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरच केले जावेत अन्यथा याविरोधात आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल, असा इशारा 'सिस्कॉम' संस्थेने दिला आहे, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...
- श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपार भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. अद्याप शोधमोहिम सुरू आहे.
सविस्तर वाचा - काश्मीरमध्ये चकमक; दोन दहशतवाद्याला कंठस्नान
- मुंबई - नरिमन पॉईंट येथील जॉली मेकर चेंबर 2 इमारती मधील बँक ऑफ बहरिन अँड कुवैतच्या सर्व्हर रूमला पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. या आगीवर सकाळी 7 वाजता अग्निशमन विभागाने नियंत्रण मिळवले आहे.
सविस्तर वाचा - नरिमन पॉईंट येथील बँक ऑफ बहरिन अँड कुवैतच्या 'सर्व्हर रुम'ला आग, आग नियंत्रणात
- मुंबई - येथील अंधेरी पूर्व मरोळ उद्योग सोसायटी मधील नंदन इंडस्ट्रीयल इस्टेट येथे रात्री 12 वाजून 49 मिनिटाला आग लागली होती. या आगीत दोन गाळे जळून खाक झाले आहेत. या आगीवर पहाटे 4 वाजून 10 मिनिटांनी अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले.
सविस्तर वाचा - अंधेरी मरोळ येथील इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आग, दोन गाळे जळून खाक, एक अधिकारी जखमी
- मुंबई - राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा शासन निर्णय काल सरकारने जारी केला. त्या निर्णयात गुणवत्तेनुसार प्रवेश देणे, या प्रक्रियेला हरताळ फासला जाणार आहे. यामुळे अकरावीचे प्रवेश हे 26 मार्च 1997 आणि 2003 मध्ये घेण्यात आलेल्या अकरावी प्रवेशाच्या शासन निर्णयानुसार आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरच केले जावेत अन्यथा याविरोधात आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल, असा इशारा 'सिस्कॉम' संस्थेने दिला आहे.
- पुणे - जगासमोर शिक्षण प्रणाली कार्यपद्धतीचा यशस्वी प्रयोग पुण्याच्या वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेने ठेवला आहे. त्यामुळे वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचे जगाने कौतुक केले आहे. त्यातच सध्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद ठेवण्याची वेळ आल्याने वाबळेवाडी शाळेच्या वारे गुरुजींच्या संकल्पनेतून 'ग्रुप होम स्कूलिंग'चा यशस्वी प्रयोग समोर आला. यात विद्यार्थीच शिक्षकाची भूमिका बजावत आहेत.
सविस्तर वाचा - 30 गावातील 434 विद्यार्थ्यांचे 'ग्रुप होम स्कूल'मधून ज्ञानार्जन; वाबळेवाडी शाळेचा यशस्वी प्रयोग
- चंद्रपूर - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील तीन महिन्यांपासून बंद असलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आता पर्यटनासाठी खुला होणार आहे. येत्या 1 जुलैपासून ताडोबातील बफर झोनमध्ये पर्यटकांना जंगलभ्रमंती करता येणार आहे. मात्र, ताडोबात जंगल भ्रमंती करताना पर्यटकांना स्वतःची कोरोनाविषयक काळजी घेणे बंधनकारक असणार आहे.
सविस्तर वाचा - 'या' तारखेपासून ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला
- मुंबई - कोरोना संकटात वैद्यकीय विद्यार्थी सेवा बजावत आहेत. यामुळे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने, एमडी आणि एमएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा डिसेंबरपर्यंत पुढे ढकलाव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हस्तक्षेप करावा आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला तसे आदेश द्यावे, अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांकडे पत्राद्वारे केली आहे.
सविस्तर वाचा - एमडी आणि एमएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा डिसेंबरपर्यंत पुढे ढकला; मुख्यमंत्री ठाकरेंची मोदींना विनंती
- सांगली - जिल्ह्यातील बहे (ता.वाळवा) येथील रामलिंग बेट परिसरात कृष्णा नदीच्या पात्रात पडून येथील जिनेशा भवरलाल पोरवाल ही ५ वर्षाची चिमुरडी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. ही घटना बुधवार (२४ जून) दुपारी साडेचारच्या दरम्यान घडली. जिनेशा ही आपली आई व इतर महिलांसमवेत बुधवारी बहे रामलिंग बेटावर फिरण्यासाठी गेली होती. यावेळी ही घटना घडली.
सविस्तर वाचा - सांगलीमध्ये कृष्णा नदी पात्रात पाच वर्षाची चिमुरडी गेली वाहून
- चेन्नई - सुशांत सिंह राजपूतचे जाणे अनेकांसाठीच जिव्हारी लागणारे होते. सुशांत आता आपल्यात नाही, यावर त्याच्या चाहत्यांना अजूनही विश्वास बसत नाही. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा धक्का पचवू न शकल्याने तामिळनाडूमधील कोईम्बतूर येथे त्याच्या चाहत्याने गळफास लावून आत्महत्या केली होती.
सविस्तर वाचा - सुशांतच्या आणखी एका चाहत्याने केली आत्महत्या ट
- सोलापूर - राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यानंतर भाजपचे नूतन आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर राज्यात सर्वत्र टीकेची झोड उठली आहे.
सविस्तर वाचा - पवारसाहेब राजकारण करत असताना पडळकर यांना चड्डी घालता येत नव्हती : शेख