नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील कामगारांना कामासाठी पुन्हा घेऊन जाण्यााधी प्रत्येक राज्याला आता सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा नियम लागू केला आहे. सोबतच त्यांचे सामाजिक, कायदेशीर आणि आर्थिक अधिकार सुनिश्चित करण्याचीही आवश्यकता असल्याचे आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे.
सविस्तर वाचा - 'आता यूपीमधील कामगारांना परत न्यायचे असल्यास सरकारची परवानगी गरजेची'
नवी दिल्ली - २५ मेपासून प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा यापूर्वी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केली होती. याबाबत कित्येक राज्यांनी आक्षेप घेतला होता, तर काहींनी आणखी मुदत मागितली होती. या सर्व राज्यांशी चर्चा केल्यानंतर, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश वगळता इतर राज्यांमधील प्रवासी विमान वाहतूक उद्यापासून (२५ मे) सुरू करण्यात येणार असल्याचे पुरी यांनी आज जाहीर केले आहे.
सविस्तर वाचा - 'ही' दोन राज्ये वगळता देशभरातील प्रवासी विमान वाहतूक होणार सुरू
मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५० हजार २३१ झाली आहे. आज ३ हजार ४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १ हजार १९६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात १४ हजार ६०० रुग्ण बरे झाले आहेत.
सविस्तर वाचा - चिंताजनक..! एकाच दिवसात 3 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण सापडले
मुंबई - कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर पडला असतानाच, उद्यापासून (२५ मे) देशांतर्गत विमान वाहतुकीला सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. याबाबत राज्याचे अल्पसंख्यांक व कौशल्यविकास मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
सविस्तर वाचा - मुंबईतूनही सुरू होणार प्रवासी विमान वाहतूक; दररोज २५ फेऱ्यांचे नियोजन
कराड (सातारा) - माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या व्हायरल झालेल्या क्लिपचा विपर्यास केला जात असल्याचे मत पाटणचे शिवसेनेचे आमदार, राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी व्यक्त केले आहे. 'मी मंत्री मंडळात नाही. सरकारपण आमचे नाही. हे सरकार शिवसेनेचे आहे', असे पृथ्वीराज चव्हाण म्हणत असल्याचे त्यात ऐकायला मिळत आहे.
सविस्तर वाचा - 'पृथ्वीराजबाबांच्या ''त्या'' वक्तव्याचा विपर्यास केला जातोय'
मुंबई - कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत कोरोनाच्या रुग्णांना विलगीकरणात ठेवता यावे म्हणून ३,७४० खाटांचे 'कोरोना केअर सेंटर' उभारले जात आहे. यासोबतच, माहीम निसर्गोपचार केंद्राच्या जागेवरही २०० खाटांचे विलगीकरण कक्ष उभारले जात आहे. यामुळे धारावीत एकूण ४,४०७ खाटांची क्षमता असलेले विलगीकरण कक्ष उपलब्ध होणार आहे.
सविस्तर वाचा -धारावीकरांसाठी उभारले जात आहे चार हजार खाटांचे विलगीकरण कक्ष..!
मुंबई - मुंबईत कोरोना विषाणुचे नवे 1725 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 30,359 वर पोहोचला आहे, तर मुंबईत झालेल्या 39 मृत्यूंमुळे मृतांचा आकडा 988 वर पोहचला आहे. मुंबईमधून 598 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 8074 वर पोहोचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
सविस्तर वाचा - मुंबईत कोरोनाचे आज 1725 नवे रुग्ण; एकूण रुग्णांचा आकडा 30 हजारांवर
नवी दिल्ली - कोरोनाविरूद्ध संरक्षण म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून भारतात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. या कारणास्तव, क्रिकेटशी संबंधित क्रियाकलापही थांबवण्यात आले. अशा परिस्थितीत क्रिकेट जगातील ख्यातनाम व्यक्ती आपापल्या घरी वेळ घालवत असून सोशल मीडियावर चाहत्यांशी संपर्क साधत आहेत. या यादीमध्ये आता भारतीय महिला क्रिकेटपटू जेमिमा रोड्रिग्जचेही नाव जोडले गेले आहे.
सविस्तर वाचा - भारताची क्रिकेटपटू बनली गायिका!..बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ
हैदराबाद - भारतामध्ये क्रिकेट या खेळाला खूप महत्त्व आहे. क्रिकेटला सर्वस्व मानणारे अनेक लोकं या क्षेत्रात मोठे झाले. क्रिकेटला एक करियर म्हणून पाहण्यासाठी अनेकजण लहान वयातच सरावाला सुरूवात करतात. गुणवत्ता असलेल्या लहान मुलांचे क्रिकेट खेळतानाचे व्हिडिओ आपण नेहमीच पाहत असतो. आता असाच एक व्हिडिओ आपल्या समोर आला आहे. या व्हिडिओची दखल भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस. लक्ष्मणने घेतली आहे.
सविस्तर वाचा - अपंग मुलाच्या गोलंदाजीने लक्ष्मण प्रभावित..पाहा व्हिडिओ
चंदीगड - ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते भारताचे महान हॉकीपटू बलबीर सिंग दोसांज (बलबीर सिनियर) यांचे आज (सोमवार) मोहालीमध्ये निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. ८ मे रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सविस्तर वाचा - भारताचे महान हॉकीपटू बलबीर सिंग यांचे निधन