ETV Bharat / bharat

Top 10 news @10 am: सकाळी दहापर्यंतच्या ठळक घडामोडी; वाचा एका क्लिकवर..

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रांतील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

सकाळी दहापर्यंतच्या ठळक घडामोडी
सकाळी दहापर्यंतच्या ठळक घडामोडी
author img

By

Published : May 24, 2020, 10:22 AM IST

मुंबई - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या भारतीयांना वंदे भारत मिशन अंतर्गत भारतात आणण्यात येत आहे. मुंबई विमानतळावर शनिवार सायंकाळपर्यंत १७ विमानांतून २४२३ भारतीय नागरिक दाखल झाले आहेत. त्यापैकी ९०६ प्रवासी मुंबईतील, ११३९ महाराष्ट्रातील तर इतर राज्यातील ३७८ प्रवासी आहेत.

सविस्तर वाचा - वंदे भारत अभियान : विविध देशांतून मुंबईत परतले २४२३ भारतीय; १,१२८ नागरिक क्वारंटाईन, परदेशी भारतीयांसाठी अधिकाऱ्यांची फौज

मुंबई - योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी आली होती. या प्रकरणी एटीएसच्या पथकाने मुंबईतून एकाला अटक केली आहे. कामरान अमीन खान (25) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याला चुनाभट्टी परिसरातील म्हाडा कॉलनी येथून अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा - योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची धमकी, आरोपीला मुंबईतून अटक

मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार १९० झाली आहे. शनिवारी २६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात ८२१ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १३ हजार ४०४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३२ हजार २०१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

सविस्तर वाचा - राज्यात शनिवारी कोरोनाचे २ हजार ६०८ नवीन रुग्ण, एकूण रुग्ण ४७ हजार १९०

मुंबई - कोरोनाचे संकट डोक्यावर असताना ऐन खरीपाच्या तोंडावर थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण असा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांचे थकीत कर्ज 'राज्य शासनाकडून येणे' दाखवून बँकांनी त्यांना खरीप हंगामासाठी नव्याने पीक कर्ज द्यावे, असे स्पष्ट आदेश सरकारने जारी केले आहेत.

सविस्तर वाचा - शेतकऱ्यांच्या कर्जाचा बोजा आता राज्य सरकारच्या डोक्यावर, खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी खुशखबर

मुंबई - मुंबई शहर व उपनगरांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे मुंबईत कोरोनाचे 198 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 583 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

सविस्तर वाचा - CoronaVirus : मुंबईत 198 कोरोनाबाधित रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 583 आयसीयूमध्ये

मुंबई - एका प्रसिद्ध हिंदी गाण्यामधील "जाना था जापान पहुंच गए चीन.." ही ओळ बहुतांश लोकांच्या परिचयाची असेल. मात्र, उत्तर प्रदेशातील मजुरांसमोर या काल्पनिक ओळीसारखाच प्रसंग घडला आहे. मुंबईहून उत्तर प्रदेशच्या गोरखपूरला जाण्यासाठी श्रमिक विशेष रेल्वे ही चक्क ओडिशाला जाऊन पोहोचली, आणि हजारो स्थलांतरीत मजुरांचा घरी जाण्याचा आनंद मालवला.

सविस्तर वाचा - 'जाना था यूपी, पहुंच गए ओडिशा!' श्रमिक विशेष रेल्वेच्या नियोजनावर प्रवासी नाराज..

न्यूयॉर्क - कोरोनाच्या महामारीमुळे अमेरिकेतील लाखो नागरिकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर याचवेळी अब्जाधीशांच्या संपत्तीत एकूण ४३ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या अॅमझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांच्या संपत्तीत ३४.६ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

सविस्तर वाचा - विषमतेचे चित्र : अमेरिकेत लाखो बेरोजगार; अब्जाधीशांच्या संपत्तीत ४३४ अब्ज डॉलरची वाढ

दुबई - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा विश्व ठप्प आहे. जगभरातील जवळपास सर्व स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने वाढ होत आहे. अशा स्थितीत आयसीसीने क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठीची तयारी सुरू केली आहे.

सविस्तर वाचा - खेळाडूंचा सराव : आयसीसीची मार्गदर्शकतत्त्वे, चार टप्प्यांत सराव सत्राच्या आयोजनाचा सल्ला

मुंबई - कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरीब कामगार आणि रोजंदारी करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सद्य घडीची परिस्थिती पाहून मुंबईचा क्रिकेटपटू सर्फराज खान याने यंदा ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. तो ईद साजरी न करता मजुरांना मदत करणार आहे.

सविस्तर वाचा - ईद साजरी न करता मजुरांना करणार मदत, मुंबईच्या क्रिकेटपटूचा निर्णय

नवी दिल्ली - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने सर्वकाही ठप्प झाले आहे. याचा मोठ्या प्रमाणात चित्रपटसृष्टीलाही फटका बसला आहे. यावर आता यामी गौतमने प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपटांच्या चित्रिकरणाला पुन्हा कधी सुरुवात होईल, याबद्दल काहीही कल्पना करता येत नसल्याचे अभिनेत्रीने म्हटले आहे.

सविस्तर वाचा - कोरोनाचा चित्रपटांच्या बजेटवरही परिणाम, यामी गौतमने सांगितले कारण...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.