- मुंबई - विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट पसरले आहे. विधिमंडळात सहभागी झालेल्या पत्रकार, कर्मचारी व आमदार यांच्या एकूण २२०० चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६ आमदारांसह ६१ कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले.
सविस्तर वाचा- विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट..! ७ आमदारांसह ६१ जण कोविड पॉझिटिव्ह
- जळगाव - ज्यांनी ज्यांनी वारंवार माझ्यावर आरोप केले, मला विधानसभेचे तिकीट मिळण्यात अडथळे निर्माण केले, माझ्या मुलीला तिकीट देऊन तिचा पराभव करण्यासाठी प्रयत्न केले, त्यांच्या विषयीचे सारे पुरावे मी पक्षाकडे दिलेले आहेत. मात्र, निवडणूक होऊन सहा महिने उलटले तरी त्यांच्यावर कारवाई का होत नाही? पुरावे नेमके कशाचे दिले आहेत, व्हिडिओ कोणाचे आहेत, रेकॉर्डिंग कशाची आहे, याबाबत पक्षाने निदान आम्हाला बोलावून तरी विचारले पाहिजे. माझे राजकीय जीवन उद्ध्वस्त करणाऱ्यांना जाब विचारण्याची हिंमत पक्षात आहे का? असा थेट सवाल आता माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाला विचारला आहे. खडसेंनी पुन्हा एकदा उघडपणे पक्षविरोधी भूमिका घेऊन बंडाचे संकेत दिले आहेत.
सविस्तर वाचा- 'माझे राजकीय जीवन उद्ध्वस्त करणाऱ्यांना जाब विचारण्याची हिंमत पक्षात आहे का?'
- मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृत्यू कशामुळे झाला? हे जाणून घेण्यासाठी तसेच त्याच्यावर काही विषप्रयोग झाला होता का? हे पाहण्यासाठी त्याचा व्हिसेरा अहवाल पुन्हा एकदा तपासला जाणार आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास एनसीबी, सीबीआय आणि ईडी हे विभाग करत आहेत. यातून तपासाचा वेग वाढावा यासाठी एनसीबी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम तयार करणार असल्याची माहिती मिळत आहे.
सविस्तर वाचा- सुशांतसिंह प्रकरण : व्हिसेरा अहवाल पुन्हा एकदा तपासला जाणार
- मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपास केला जात आहे. एनसीबीने या संदर्भात आणखी एक कारवाई केली आहे. एनसीबीकडून मुंबईत काही ठिकाणी छापे मारण्यात आले. या कारवाईदरम्यान एलसीडी पेपर, मारी कॅप्सूल, हस्तगत करण्यात आले आहेत. यासंदर्भात अनुज केशवानी या आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अनुज केशवानी याची रवानगी पाच दिवसांच्या एनसीबी कोठडीत केली आहे.
सविस्तर वाचा- ड्रग्ज प्रकरणी अनुज केशवानी याला ५ दिवसांची एनसीबी कोठडी
- मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने स्वतः ड्रग घेत असल्याची कबुली एका व्हिडिओमध्ये दिली आहे. कंगना मित्रांनाही ड्रग्जसाठी जबदरस्ती करत होती, हे विधाने व काही व्हिडिओच्या माध्यमातूनही स्पष्ट होत आहे. या सर्वाची दखल घेत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो विभागाने कंगनाची ड्रग्ज संदर्भात चौकशी केली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
सविस्तर वाचा- ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने स्वतःहून कंगनाची चौकशी करावी- सचिन सावंत
- मुंबई - मुंबई पोलिसांवर विश्वास नसलेल्या लोकांना व सुरक्षा दिली जात असेल तर, हे देशाचे दुर्दैव आहे. परंतु ज्यांचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही, हे सगळे महाराष्ट्रद्रोही आता देशभक्त झाले आहेत, अशी जहाल टीका राज्य मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपा सरकारवर केली आहे. कंगना ही सध्या भाजपाची पोपट झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
सविस्तर वाचा- 'कंगना ही भाजपची पोपट'; विजय वडेट्टीवार यांची टीका
- पुणे - रुग्णवाहिका मिळत नसल्याने पुण्यातील मनसे नगरसेवकाने उपायुक्तांची गाडी फोडली आहे. पुणे शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून, लोकांना अंत्यविधीसाठी वेटिंगवर थांबावे लागत आहे. यासोबतच रुग्णालयातून स्मशानभूमीमध्ये मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सविस्तर वाचा-पुण्यात रुग्णवाहिका मिळत नसल्याने मनसे नगरसेवकाने फोडली उपायुक्तांची गाडी
- मुंबई - व्हिडिओकॉन आयसीआयसीआय बँकेच्या घोटाळ्यासंदर्भात आयसीआयसीआयच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक यांना ई़डीकडून अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील कार्यालयामध्ये दीपक कोचर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
सविस्तर वाचा- चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना ईडीकडून अटक
- पाटणा - बिहारमधील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांमध्ये आपली उपस्थिती निर्माण करण्यासाठी मुद्दे शोधण्यास सुरवात केली आहे. सुशांतच्या मृत्यूचे प्रकरण या निवडणुकीत राजकीय पक्षांचे 'शस्त्र' ठरणार आहे.
सविस्तर वाचा- सुशांत प्रकरण ठरणार बिहार निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा
- अबूधाबी - आयपीएल २०२० स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच राजस्थान रॉयल्स संघाला एक मोठा धक्का बसला आहे. रॉयल्सचा महत्वाचा खेळाडू बेन स्टोक्स यंदाच्या हंगामातील सुरुवातीचे काही सामने मुकण्याची शक्यता आहे. बेनच्या वडिलांवर ब्रेन कॅन्सरचे उपचार सुरु आहेत. यासाठी तो पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका अर्ध्यातून सोडून न्यूझीलंडला परतला होता. आता तो आयपीएलचे सुरूवातीचे काही सामने मुकणार असल्याचे वृत्त आहे.
सविस्तर वाचा-IPL २०२० : राजस्थान रॉयल्ससमोर संकट, 'हा' महत्वाचा खेळाडू स्पर्धेबाहेर