ETV Bharat / bharat

Top 10 @ 7 AM : सकाळी सातच्या ठळक बातम्या!

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 At 7 AM
सकाळी सातच्या ठळक बातम्या
author img

By

Published : Sep 5, 2020, 7:00 AM IST

  • मुंबई - थोर भारतीय तत्वज्ञ, विद्वान आणि राजकारणी सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज १३२वी जयंती आहे. त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतात 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ. राधाकृष्णन यांनी १९०९ ते १९४८ पर्यंत शै‍क्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार सांभाळला. राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १९८८ रोजी ब्रिटिश भारताच्या मद्रास प्रांतातील तिरुत्तानी येथे झाला. त्यांच्या तत्वज्ञानाचा आणि उपदेशाचा जगभरात मोठा परिणाम झाला.

सविस्तर वाचा- दिनविशेष : कोरोनाकाळातील 'शिक्षक दिन'

  • शिरूर (पुणे) - जीवनाला दिशा देण्यात आणि माणसाच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा असतो. त्यामुळेच शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे. शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा जगभरात आहे. विविध देशांत वेगवेगळ्या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो भारतात शिक्षक दिन ५ सप्टेंबरला साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस. त्यांनी भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषविली.

सविस्तर वाचा- शिक्षक दिन : कोरोनाच्या संकटातही वाबळेवाडीच्या गुरुजनांचे ज्ञानदान; 'ग्रुप होम स्कूल'चा यशस्वी प्रयोग

  • मुंबई-अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या ड्रग कनेक्शन संबंधी सॅम्युअल मिरांडा आणि शोविक चक्रवर्ती यांची एनसीबीने आज चौकशी केली. दिवसभर तब्बल अकरा तासाच्या‌ चौकशीनंतर दोघांना अटक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी) चे उपमहासंचालक केपीएस मल्होत्रा यांनी दिली. या दोघांनाही उद्या (शनिवारी) न्यायालयापुढे हजर केले जाणार असून एनसीबी कोठडीची मागणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सविस्तर वाचा- सॅम्युअल मिरांडा आणि शोविक चक्रवर्ती यांना अटक; के.पी.एस मल्होत्रा यांची माहिती

  • मुंबई - राज्यातील कला महाविद्यालय आणि इतर संस्थांच्या प्राध्यापकांना अरेरावी आणि शिवीगाळ केल्याचे प्रकरण राज्याचे प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांना चांगलेच भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अशाप्रकारे शिवीगाळ केल्याचे समोर आले तर त्यांची उच्चस्तरीय संबधित अधिकार्‍यांकडून चौकशी करू, अशी माहिती 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

सविस्तर वाचा- कला संचालकांची होणार उच्चस्तरीय अधिकार्‍यांकडून चौकशी; प्राध्यापकांना शिवीगाळ प्रकरण भोवण्याची शक्यता

  • हैदराबाद- भारतात सध्या कोरोनाची एकूण ३९ लाख ३६ हजार ७४७ प्रकरणे आढळली असून ६८ हजार ४७२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत असले तरी भारतात लोकांचा बरे होण्याचा दरही सतत वाढत आहे. आता हा दर ७७.१ टक्के असा आहे.

सविस्तर वाचा- भारतातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

  • मुंबई - शुक्रवारी कोरोनाचे १९२९ नवे रुग्ण आढळून आले असून ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २८ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये २५ पुरुष तर १० महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाख ५२ हजार २४ वर पोहोचला आहे.

सविस्तर वाचा- मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत तिसऱ्या दिवशीही वाढ, २४ तासात नव्या १९२९ रुग्णांची नोंद

  • मुंबई - आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमी चर्चेत असणाऱ्या अमृता फडवणीस यांनी नव्याने केलेल्या ट्विटमुळे पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे. यावेळी त्यांनी मुंबई आणि मुंबई पोलिसांच्या विरोधात बोलणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौत हिची बाजू घेतली आहे. कंगनाची बाजू मांडल्याने नेटकऱ्यांनीही अमृता फडणवीस यांना धारेवर धरले आहे.

सविस्तर वाचा- अमृता फडणवीस कंगनाच्या पाठीशी, नेटकऱ्यांनी ट्विटवर व्यक्त केला संताप

  • नागपूर - शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून आज अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांच्याकडून हा पदभार स्वीकारण्यात आला. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे, हाच मुख्य उद्देश असल्याचे मतही अमितेश कुमार यांनी यावेळी मांडले. पोलीस आयुक्त कार्यालयात हा पदभार स्वीकारण्यात आला.

सविस्तर वाचा- नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांनी स्वीकारला पदभार

  • मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात झाडे पडण्याच्या घटना घडतात. अशा दुर्घटनेत नागरिक जखमी होण्याच्या तसेच मृत्यू होण्याच्या घटना घडतात. अशीच एक घटना लोअर परळ येथे घडली आहे. अंगावर झाड पडून एका ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

सविस्तर वाचा- लोअर परळ येथे अंगावर झाड कोसळून ९ वर्षीय मुलाचा मृत्यू

  • जोधपूर (राजस्थान)- दिपीकाला जाणवले होते, की आपला जन्म चुकीच्या शरीरात झाला आहे, ज्यानंतर तिने हिंमतीने लिंगपरिवर्तन करुन घेतले. मात्र, समाजात असे कित्येक दीपक आणि दिपीका आहेत जे ही हिंमत करु शकत नाहीत, आणि नाईलाजाने आपल्या वाट्याला आलेले जीवन तसेच जगत आहेत.

सविस्तर वाचा- ..अन् 'दीपक' झाला 'दिपीका'; लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर मिळाली नवसंजीवनी!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.