- मुंबई - कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोल मधून सवलत मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.
सविस्तर वाचा - कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ - एकनाथ शिंदे
- वॉशिंग्टन डी. सी - जगभरात कोरोनाचा कहर सुरु असून अमेरिकेला कोरोनाचा सर्वांत जास्त फटका बसला आहे. यातच अमेरिकेमध्ये येत्या काही दिवसांत अध्यक्षपदाच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकीकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांची निवड केली आहे.
सविस्तर वाचा - अमेरिका : उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरीस कोण आहेत ? भारताशी निकटचे नाते...
- मुंबई - पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे विधान केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व पार्थ यांचे आजोब शरद पवार यांनी आपले मत व्यक्त केले. हा सर्व त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. यावर मी मत व्यक्त करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
सविस्तर वाचा - शरद पवारांचे कोणतेही विधान निरर्थक नसते - संजय राऊत
- जयपूर - राजस्थानमध्ये मागील काही दिवसांपासून सत्ता नाट्य सुरु आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट आणि समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यापासून गेहलोत सरकार धोक्यात आले होते. मात्र, सचिन पायलट यांच्या अडचणी सोडविण्यासाठी काँग्रेसने समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा वाद संपुष्टात येताना दिसत आहे.
सविस्तर वाचा - राजस्थान सत्तासंघर्ष: १४ ऑगस्टला गेहलोत सरकार मांडणार विश्वासदर्शक ठराव
- मुंबई - तब्बल तीन वेळा पुढे ढकललेल्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 सप्टेंबरपासून विधिमंडळाच्या पार्किंगमध्ये घेण्याचा विचार सध्या विधिमंडळ पातळीवरती सुरू आहे. 28 ऑगस्टला होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
सविस्तर वाचा - विधानभवनाच्या पार्किंगमध्ये होणार विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन?
- मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूरने गुरुवारी आपल्या दिवंगत आई आणि दिग्गज स्टार श्रीदेवीसह स्वत: चा एक अनमोल थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. श्रीदेवीच्या 57 व्या जयंतीनिमित्त, जान्हवी कपूरने इंस्टाग्रामवर एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या आईला मिठी मारताना दिसत आहे.
सविस्तर वाचा - 'आय लव्ह यू मम्मा', म्हणत अभिनेत्री जान्हवीने केले आईचे स्मरण
- मुंबई- सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमधील अनु - सिद्धार्थची केमिस्ट्री पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. त्यांच निस्वार्थी नातं, एकमेकांमधील विश्वास आणि प्रेम, तसेच एकमेकांच्या मिळालेल्या खंबीर साथीमुळे संकटावर त्यांनी केलेली मात हे सगळ एकदा पुन्हा अनुभवता येणार आहे.
सविस्तर वाचा - 'सुखाच्या सरींनी मन हे बावरे' मालिकेत होणार 'ह्या' अभिनेत्याची एन्ट्री
- विरार (पालघर) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना विरार येथील महापालिकेत घातलेल्या राड्याप्रकरणी विरार पोलिसांकडून तडीपारीची नोटीस बजाविण्यात आली होती. याबाबत तडीपार का करण्यात येऊ नये, याबाबतची बाजू एकूण घेण्यासाठी जाधव यांना विरार उपविभागीय अधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आले होते.
सविस्तर वाचा - माझ्या तडीपारीच्या षडयंत्रामागे ठाण्यातील बड्या नेत्याचा हात - अविनाश जाधव
- भोपाळ : मध्य प्रदेशच्या रतलाममधून जाणाऱ्या बायपासवर एका टँकरमधून अचानक अॅसिड गळती सुरू झाली. त्यामुळे वाहतूकीला काही वेळ अडचण आली, तसेच आजूबाजूच्या गावांमध्येही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्तर वाचा - रतलाम बायपासवर टँकरमधून अॅसिड गळती, परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण
- काठमांडू (नेपाळ) – कोरोनामुळे अर्थव्यस्था मंदावली असतानाही नेपाळला चालू आर्थिक वर्षात 2 लाख विदेशी पर्यटक भेट देतील अशी अपेक्षा आहे. यामधील बहुतांश पर्यटक हे भारतीय असतील, असे नेपाळच्या पर्यटन मंडळाने म्हटले आहे.
सविस्तर वाचा - सीमारेषेचा वाद करणाऱ्या नेपाळच्या पर्यटन उद्योगाची भारतीय पर्यटकांवरच भिस्त