ETV Bharat / bharat

राजस्थानसह ओडिशातील फटाक्यांवरील बंदी उठवावी; तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची विनंती - फटाकेबंदी

पलानीस्वामी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि नवीन पटनायक यांना याबाबत पत्र लिहून विनंती केली. देशभरातील ९० टक्के फटाक्यांचे उत्पादन हे एकट्या तामिळनाडू राज्यात होते. यामुळे राज्यातील जवळपास ८ लाख लोकांना रोजगार प्राप्त होते, असेही पलानीस्वामी यांनी पत्रात नमूद केले आहे.

राजस्थानसह ओडिशातील फटाक्यांवरील बंदी उठवावी; तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची विनंती

author img

By

Published : Nov 5, 2020, 8:24 PM IST

चेन्नई - तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी राजस्थान आणि ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांना एक विनंती केली आहे. फटाक्यांच्या विक्री आणि वापरावरील बंदी उठवावी, अशी मागणी पलानीस्वामी यांनी केली. फटाक्यांवरील बंदीमुळे तामिळनाडूतील जवळपास ८ लाख कामगारांना फटका बसेल. त्यांचा रोजगार जाणार, अशी भीतीही पलानीस्वामी यांनी व्यक्त केली आहे. तामिळनाडू हे राष्ट्रीय पातळीवर 'फायरवर्क हब' म्हणून ओळखले जाणारे राज्य आहे.

पलानीस्वामी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि नवीन पटनायक यांना याबाबत पत्र लिहून विनंती केली. देशभरातील ९० टक्के फटाक्यांचे उत्पादन हे एकट्या तामिळनाडू राज्यात होते. यामुळे राज्यातील जवळपास ८ लाख लोकांना रोजगार प्राप्त होते, असेही पलानीस्वामी यांनी पत्रात नमूद केले आहे. कामगारांचे संपूर्ण जीवन दिवाळी काळातील फटाक्यांच्या विक्रीवर अवलंबून असते. यामुळे तुमच्या राज्यातील फटाक्यांवरील बंदीमुळे या कामगारांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, अशी भीतीही पलानीस्वामी यांनी व्यक्त केली आहे.

'तामिळनाडूत मुख्यत: ग्रीन फायरक्रॅकर्सची निर्मिती होते. यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचण्याचा मुद्दा निर्माण होत नाही. फटाके जाळल्यामुळे कोरोना रुग्णांच्या आरोग्याला हानी होऊ शकते, असा कुठलाही अहवाल अद्याप आलेला नाही, असेही पलानीस्वामी यांनी पत्रात म्हटले आहे. माझी विनंती आहे की तुम्ही राज्यातील फटाक्यांवरील बंदी उठवावी आणि विक्री करू द्यावी, असेही ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.