ETV Bharat / bharat

भाजपच्या 'जय श्रीराम' पोस्टकार्डला तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी 'असे' दिले प्रत्युत्तर

भाजपच्या 'जय श्रीराम'ला प्रत्युत्तर म्हणून तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी 'वंदे मातरम, जय हिंद, जय बांगला' लिहिलेली १० हजार पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

author img

By

Published : Jun 4, 2019, 6:48 PM IST

तृणमूलचे कार्यकर्ते वंदे मातरम लिहिलेली पोस्टकार्ड दाखवताना

कोलकाता - नवनिर्वाचित भाजप खासदार अर्जून सिंह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना जय श्रीराम लिहिलेली १० लाख पोस्ट कार्ड पाठवणार असल्याचे सांगून या सर्वजणांना अटक करून दाखवण्याचे आव्हान ममतांना केले होते. आता तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी याला प्रत्युत्तर देत 'वंदे मातरम, जय हिंद, जय बांगला' लिहिलेली १० हजार पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवण्याच निर्णय घेतला आहे.

ममता बॅनर्जींच्या गाडीसमोर येऊन जय श्रीरामच्या घोषणा देणे बरोबर आहे का? कोणाच्या गाडीसमोर येवून घोषणा देणे हे बरोबर आहे का? त्यांच्यासोबत येथील आमदार आणि खासदारही जय श्रीरामच्या घोषणा देत आहेत. आम्ही प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधानाच्या गाडीसमोर जावून काही अशा घोषणा देणार नाही आणि त्यांचा मार्गही अडवणार नाही. परंतु, आम्ही एक संदेश नक्की देणार आहोत. आम्ही प्रत्युत्तर म्हणून वंदे मातरम लिहिलेली १० हजार पोस्ट कार्ड पाठवणार आहोत.

गेल्या बुधवारी उत्तर २४ परगाणा जिल्ह्यात ममता बॅनर्जी गेल्या होत्या. त्यावेळी ममतांच्या ताफ्यासमोर एका गटाने जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. यावेळी ममतांनी गाडीतून खाली उतरत घोषणा करणारे बंगालचे नसून बाहेरची लोक आहेत. घोषणा करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे, असे ममतांनी म्हटले होते.

Intro:Body:

National NEWS 01

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.