ETV Bharat / bharat

तीस हजारी प्रकरण : केंद्रीय गृहमंत्रालयाची स्पष्टीकरण मागणारी याचिका रद्द

author img

By

Published : Nov 6, 2019, 4:34 PM IST

दिल्ली उच्च न्यायालयाने गृहमंत्रालयाची स्पष्टीकरण मागणारी याचिका रद्द केली आहे. तर, एका पोलिसाने साकेत कोर्ट प्रकरणातील वकीलांवर एफआयआर दाखल करण्यासाठी केलेली याचिकाही रद्द करण्यात आली आहे.

Tis Hazari Violence

नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने तीस हजारी प्रकरणावर दिलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण मागणारी याचिका केंद्रीय गृहमंत्रालयाने दाखल केली होती. त्यावर सध्या दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत दिल्ली उच्च न्यायालयाने गृहमंत्रालयाची स्पष्टीकरण मागणारी याचिका रद्द केली आहे. तर, एका पोलिसाने साकेत कोर्ट प्रकरणातील वकीलांवर एफआयआर दाखल करण्यासाठी केलेली याचिकाही रद्द करण्यात आली आहे.

  • Delhi High Court also dismisses another application of Police seeking permission to lodge FIR against lawyers in Saket District Court incident https://t.co/0YdCuOiNsD

    — ANI (@ANI) November 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
दरम्यान, मंगळवारी पोलिसांनी दिल्ली पोलीस मुख्यालयाच्या बाहेर आंदोलन केले होते. अकरा तासांनंतर मात्र पोलिसांनी हे आंदोलन मागे घेतले होते. दुसरीकडे दिल्लीतील रोहिणी आणि साकेत न्यायालयाबाहेर सलग तिसऱ्या दिवशी वकीलांचे आंदोलन सुरुच आहे. त्यातच आज (बुधवार) एका वकीलाने रोहिणी न्यायालयाच्या समोरील उंच इमारतीवर उभे राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने त्याला तसे करण्यापासून रोखण्यात यश आले.
काय आहे प्रकरण..?
२ नोव्हेंबरला म्हणजेच मागील आठवड्यात शनिवारी एका वकिलाला दिल्ली पोलिसांनी तीस हजारी न्यायालयाच्या कोठडीत जाण्यापासून रोखले. त्यानंतर वकील आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती. काही वेळातच बाचाबाचीचे रुपांतर हिसांचारात झाले. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. या घटनेत अनेक पोलीस आणि वकिल जखमी झाले. हिंसाचारात पोलीस गाड्या जाळण्यात आल्या. तसेच अनेक वाहनांचे नुकसान झाले.

Intro:Body:

तीस हजारी प्रकरण : केंद्रीय गृहमंत्रालयाची स्पष्टीकरण मागणारी याचिका रद्द

नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने तीस हजारी प्रकरणावर दिलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण मागणारी याचिका केंद्रीय गृहमंत्रालयाने दाखल केली होती. त्यावर सध्या दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यामध्ये आतापर्यंत दिल्ली उच्च न्यायालयाने गृहमंत्रालयाची स्पष्टीकरण मागणारी याचिका रद्द केली आहे. तर, एका पोलिसाने साकेत कोर्ट प्रकरणातील वकीलांवर एफआयआर दाखल करण्यासाठी केलेली याचिकाही रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान, मंगळवारी पोलिसांनी दिल्ली पोलीस मुख्यालयाच्या बाहेर आंदोलन केले होते. अकरा तासांनंतर मात्र पोलिसांनी हे आंदोलन मागे घेतले होते. दुसरीकडे दिल्लीतील रोहिणी आणि साकेत न्यायालयाबाहेर सलग तिसऱ्या दिवशी वकीलांचे आंदोलन सुरुच आहे. त्यातच आज (बुधवार) एका वकीलाने रोहिणी न्यायालयाच्या समोरील उंच इमारतीवर उभे राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने त्याला तसे करण्यापासून रोखण्यात यश आले.

काय आहे प्रकरण..?

२ नोव्हेंबरला म्हणजेच मागील आठवड्यात शनिवारी एका वकिलाला दिल्ली पोलिसांनी तीस हजारी न्यायालयाच्या कोठडीत जाण्यापासून रोखले. त्यानंतर वकील आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती. काही वेळातच बाचाबाचीचे रुपांतर हिसांचारात झाले. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. या घटनेत अनेक पोलीस आणि वकिल जखमी झाले. हिंसाचारात पोलीस गाड्या जाळण्यात आल्या. तसेच अनेक वाहनांचे नुकसान झाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.