हैदराबाद - कोरोना व्हायरसचे युद्ध जिंकण्यासाठी सैन्य हे एकमात्र शस्त्र असल्याचे अमेरिका, इटली, चीन, आणि स्पेनसारख्या देशांनी अनुभवले आहे. सध्या देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे अजूनही वेळ हाताबाहेर गेली नसून आपल्या भारतीय सैन्याला या कोरोनाविरोधाल्या लढाईला जिंकण्यासाठी मैदानात उतरवणे गरजेचे आहे. तसेच भारतीय सैन्याच्या रुग्णालयांची ताकद संपूर्ण जगाला माहिती आहे.
सैन्याच्या तीनही दलांची सध्य परिस्थिती -
भारतीय नौदल -
![indian force](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6688450_naval_0804newsroom_1586327168_238.jpg)
- कोरोनासंदर्भातल्या चाचणीसाठी 38 नमुने घेऊन भारतीय नवदलाचे एक डोर्नियर विमान 31 मार्चला आयएनएस हंसावरून पुण्यासाठी रवाना झाले होते.
- हे नमुने गोव्यातील आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने घेतले होते.
- कोरोनाविरोधात लढण्यासाठी सध्या व्हेंटिलेटचा जास्ती वापर केला जात आहे. यासाठी भारतीय नवदलाने एक व्हेंटिलेटर तयार केले असून या व्हेंटिलेटरद्वारे एकावेळी सहा रुग्णांवर उपचार करण्यात येतील
- शेजारील देशांमधून मदत घेऊन येण्यासाठी किंवा त्यांना मदत पोहचवण्यासाठी दोन विशेष जहाज तैनात करण्यात आले आहेत.
भारतीय थलसेना -
![indian force](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6688450_army_0804newsroom_1586327168_568.jpg)
- कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सरकारला मदतीसाठी २५ हजार नॅशनल कॅडेटचे जवान व काही निवृत्त सैन्याचे जवान सध्या काम करत आहेत.
- जवळपास ९ हजारपेक्षा जास्त रुग्णालयांमध्ये बेड तयार करण्यात आले असून ८ हजार ५०० डॉक्टरांची मदत घेतली जात आहे.
- जैसलमेर, जोधपूर, चेन्नई, मानेसर, हिंडन आणि मुंबई येथे १ हजार पेक्षा जास्त सैनिकांना अतिरिक्त ठेवण्यात आले आहे. -
- लॉकडाऊनच्या काळात देशात सैनिक व निवृत्त सैनिकांना ड्युटीवर तैनात करण्यात आले आहे.
भारतीय वायू सेना -
![indian forces](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6688450_air_0804newsroom_1586327168_430.jpg)
- देशातील सध्य परिस्थितीवर अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी वायुसेनेची मदत घेतली जाणार आहे.
- रोड वाहतुकीला काही अडथळा आल्यास वायुसेनेने जम्मू-काश्मीर, लडाख, मणिपूर आणि नागालँड येथील सैन्याची विमानतळे अलर्टवर ठेवण्यात आली आहेत.
- वायू दलाने मागील तीन दिवसात २५ टन अत्यावश्यक वस्तू वेगवेगळ्या भागात पुरवल्या आहेत. तसेच जिथे गरज असेल तिथे आम्ही गरजेच्या वस्तूंचा पुरवठा करणार असल्याजे वायू दलाने सांगितले आहे.
- कोरोनाचे नमुने तात्काळ घेऊन जाण्यासाठी वायूदलाचे छोटो डॉर्नियर विमानं तैनात करण्यात आली आहेत.
- कोरोनाच्या लढाईसाठी अतिरिक्त डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टाफ, सॅनिटायझर, मास्क, थरमल स्कॅनर तयार असल्याची माहिती सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
- शेजारील देशांमधून अत्यावश्यक वस्तू घेऊन येण्यासाठी दोन विशेष विमानं तैनात करण्यात आली आहेत.
ट्रेंड मॅनपावर
![indian army](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6688450-thumbnail-3x2-forces_0804newsroom_1586327168_275.jpg)
भारतीय सैन्यामध्ये ट्रेंड मॅनपावर ही एक महत्वाची तुकडी असून गरज पडल्यास काही तासांमध्ये ही तुकडी घटनास्थळी जाऊन मदत करते. कोरोना संकटासाठी ही तुकडीदेखील सज्ज आहे.
सैन्य दलातून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांना परत आपत्कालीन परिस्थितित सैन्य बोलावू घेऊ शकते. त्यामुळे निवृत्त सैनिकांनाही अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
कोरोनाविरोधात लढण्यासाठी येथे घेतली जाईल सैन्याची मदत -
कोरोना संकटाच्या काळात देशातील लॉकडाऊनवर लक्ष ठेवण्यासाठी सैन्याची मदत घेतली जाईल
अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी सैन्याचे मोठे टॅक, जहाज, विमानं सज्ज आहेत.
तांत्रिक कारणांसाठी सैन्यातील अभियंत्यांचीदेखील मदत घेतली जाईल.
लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सैन्याची मदत होईल
लोकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी सैन्याचा उपयोग होईल
भारतीय सैन्याचा आरोग्य विभाग -
कोरोना संकटावर मात करण्यासाठी भारतीय सैन्यातील आरोग्य विभागाची मोठी भूमिका असणार आहे. चीनमधील वूहान शहरामध्येही सैन्याच्या डॉक्टरांनी येथील परिस्थिती आटोक्यात आणली होती.
त्यामुळे भारतीय सैन्यातील डॉक्टरांना कोरोनाविरोधातल्या लढाईसाठी सज्ज ठेवण्यात आले असून काही नवीन कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात येत आहे.
चीन में कोरोना से लड़ाई में देश की पीपुल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ने देश की चिकित्सा और आवश्यक आपूर्ति को संभाला.
चीनमध्ये कोरोनाच्या काळात सैन्यानेच अतिशय कमी कालावधीत रुग्णालये स्थापन केली होती. त्याप्रमाणेच आपल्या भारतीय सैन्याचाही रुग्णालये उभारण्यासाठी मदत होणार आहे.
भारतातील अनेक शहरांमध्ये सैन्याचे छोटे, मोठे रुगणालये आहेत. या सर्व रुग्णालयांचा वापर कोरोनाविरोधातल्या लढाईसाठी केला जाईल.
नॅशनल कॅडेटचे जवान -
देशातील विविध भागांमध्ये औषध, मेडिकलचे साहित्य, अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे काम नॅशनल कॅडेटच जवान पकरण्यात अग्रेसर आहेत.
पंजाबमध्ये गार्डियस ऑफ गवर्नेसची संस्था असून यात वयोवृद्धदेखील कोरोनाचा सामना करण्यासाठी काम करत आहेत. देशातील महत्वाचा डाटा एकत्रिक करण्याचे काम हे सर्वजण करत आहेत.
छत्तीसगड सरकारच्या पोलिसांना मदतीसाठी काही निवृत्त सैनिकांना पाचारण करण्यात आले आहे.
गोव्यामध्ये एक नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. यात निवृत्त सैनिक आणि स्थानिक प्रशासन एकत्रितपणे काम करत आहेत.
त्यामुळे कोरोनाविरोधातल्या संकटाशी युद्धासाठी भारतीय सैन्य तयार असल्याचे पाहायला मिळत आहे.