नवी दिली - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज संयुक्त पत्रकार परिषद घेत कोरोना संबंधीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर घोषणा केली. संशोधकांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणाल लसींचे उत्पादन करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. कोरोनावरील तीन लसींना परवाना देण्याचा सरकार विचार करत आहे. यावरील काम अंत्यत जलदगतीने सुरू आहे. या लसींपैकी सर्वांना किंवा एकाला तरी लवकरात लवकर परवाना मिळण्याची शक्यता आहे, असे निती आयोगाचे सदस्य व्ही. के पॉल यांनी सांगितले.
शीतगृहांची साखळी पर्याप्त
३ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यास सध्या अस्तित्वात असलेली शीतगृहांची साखळी कार्यक्षम आहे. यात अतिरिक्त लसींचा साठा ठेवता येईल, असे आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.
जगभरातील कोरोना लस निर्मितीची स्थिती
लसीचे नाव | किंमत (डॉलरमध्ये) | देश | अचूकता(%) | कंपनी | कधी बाजारात येणार |
ChAdOx1/Covishield | ३ ते ४ | भारत/स्वीडन/इंग्लड | ९० टक्के | ऑक्सफर्ड, अस्त्राझेनेका, सीरम | डिसेंबर (पहिल्यांदा इंग्लडमध्ये) |
BNT162b2 mRNA | २० | अमेरिका, जर्मनी | ९५ टक्के | फायझर, बायोएनटेक | डिसेंबर (पहिल्यांदा अमेरिकेत) |
mRNA | २५ ते ३७ | इंग्लड | ९४.५ टक्के | मॉडेर्ना, NIH | डिसेंबर-जानेवारी(२०२१) पहिल्यांदा इंग्लमध्ये |
Ad26 | अमेरिका | जॉन्सन अॅन्ड जॉन्सन, बेथ इस्त्रायल | |||
Gam-Covid-Vac | १० | रशिया | ९५ टक्के | गमालिया रिसर्च इन्स्टिट्यूट | |
Ad5 | चीन | कॅनसिनो बायो, अॅकॅडमी ऑफ मिलिटरी | |||
Nicotiana benthamiana | कॅनडा | अनहुई झिफेई आणि लाँगकॉम | |||
Wuhan vaccine | चीन | सीनोफार्म | |||
CoronaVac | चीन | सीनोवॅक बायोटेक | |||
कोवॅक्सिन इंडिया | भारत बायोटेक, आयसीएमआर | ||||
स्पुटनिक व्ही | २० पेक्षा कमी | 95 टक्के | रशियन संरक्षण मंत्रालय, गमालिया रिसर्च इन्स्टिट्यूट | ||