बंगळुरू - कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यातील एका गावामध्ये गावकऱ्यांनी तीन मुस्लीम व्यक्तींना मारहाण केल्याची घटना घडली आहे. तबलिगी जमातच्या निझामुद्दीन मरकझ कार्यक्रमामध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून या तिघांना गावकऱ्यांनी मारहाण केली आहे.
जिल्ह्याच्या बिदारी गावातील ही घटना आहे. महालिंगपुरा गावातील तीन रहिवासी या गावामधून चालले होते, यावेळी गावकऱ्यांनी त्यांना काठ्यांनी मारहाण केली. हे तिघेही तबलिगी जमातचे सदस्य असल्याच्या संशयातून ही मारहाण करण्यात आली. आपण जमातचे सदस्य नसल्याचे वारंवार सांगूनही लोकांनी त्या तिघांचे म्हणणे ऐकले नाही.
दरम्यान, या घटनेचा गांभीर्याने तपास सुरू असून, या तिघांवर हल्ला करणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक लोकेश जगसलार यांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा : आरोग्य कर्मचाऱ्यांना दहा टक्के 'बोनस'; तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा..